बसमध्ये हस्तमैथून करणाऱयाला युवतीने चोपले

file photo
file photo

नवी दिल्लीः राजधानीत धावत्या बसमध्ये युवतीशेजारी बसून हस्तमैथून करणाऱया विकृत युवकाला युवतीने चोपले.  शिवाय, बसमधूनच याबाबतची माहिती पोलिसांना दिली. विकृत युवकाला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

युवती एका महाविद्यालयात शिक्षण घेत असून, ती कपास हेरा ते वसंत कुंज या मार्गावरील बसने प्रवास करत होती. बसमध्ये महिलांसाठी राखीव असलेल्या आसनावर ती बसली होती. यावेळी एक युवक तिच्या समोरच्या आसनावर येऊन बसला. युवतीकडे पाहून त्याने हस्तमैथून सुरू केले. तिने विकृत प्रकार पाहून त्याला चोपायला सुरवात केली. शिवाय, बसमधूनच पोलिसांशी संवाद साधला. पोलिसांनी त्याला अटक केली.

बसमध्ये विकृत युवक अश्लील चाळे करत असताना कोणीही काही बोलले नाही शिवाय, मदतीलाही धावून आले नाही. अखेर, मीच उठून त्याला चोपले अन् पोलिसांना कळवले, असे युवतीने सांगितले.

दरम्यान, दिल्लीत यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात असाच प्रकार घडला होता. यावळी युवतीने हस्तमैथून करतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद करून सोशल मीडियावर अपलोड केला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली होती. शिवाय, निर्भयावर बसमध्येच सामूहिक बलात्कार झाला होता. बलात्कारानंतर तिचा मृत्यू झाला होता. या घटनेचा आंतरराष्ट्रीय स्तरावरून निषेध करण्यात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com