जगातील महाग बाजारपेठेत 'खान मार्केट' या क्रमांकावर...

वृत्तसंस्था
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

पहिल्या क्रमांकावर हॉंगकॉंगमधील "कॉजवे बे' आहे. "कुशमॅन अँड वेकफिल्ड' या जागतिक संपत्ती सल्लागार कंपनीने "मेन स्ट्रीट्‌स अक्रॉस द वर्ल्ड 2019' हा अहवाल जाहीर केला आहे.

नवी दिल्ली: राजधानीतील उच्चभ्रू भागातील "खान मार्केट' जगातील विसावी सर्वांत महाग बाजारपेठ ठरली आहे. यात पहिल्या क्रमांकावर हॉंगकॉंगमधील "कॉजवे बे' आहे. "कुशमॅन अँड वेकफिल्ड' या जागतिक संपत्ती सल्लागार कंपनीने "मेन स्ट्रीट्‌स अक्रॉस द वर्ल्ड 2019' हा अहवाल जाहीर केला आहे. यंदाच्या दुसऱ्या सहामाहीतील भाडे लक्षात घेऊन ही यादी तयार करण्यात आली आहे. यात 68 देशांमधील 448 जागांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

गेल्या वर्षीच्या यादीत "खान मार्केट'चा क्रमांक 21वा होता. खान मार्केटमध्ये दुकान भाडेतत्त्वावर घेण्यासाठी वार्षिक खर्च 243 डॉलर (सुमारे 17 हजार 45 रुपये) प्रतिचौरस फूट आहे. गेल्या वर्षी याचे वार्षिक भाडे 237 डॉलर (17 हजार 14 रुपये) प्रतिचौरस फूट होते. पहिल्या स्थानावर असलेल्या "कॉजव बे' येथील वार्षिक खर्च दोन हजार 745 डॉलर (1.97 लाख रुपये) प्रतिचौरस फूट आहे. न्यूयॉर्कमधील "अप्पर फिफ्थ ऍव्हेन्यू' दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथील एका वर्षाचे भाडे 2,250 डॉलर (1.61 लाख रुपये) प्रतिचौरस फूट आहे. तिसऱ्या क्रमांवरील लंडनमधील न्यू बॉंड स्ट्रीटवरील दुकानांचे वार्षिक भाडे सुमारे एक हजार 714 डॉलर (1.23 लाख) चौरस फूट आहे. पॅरिसमधील "ऍव्हेन्यू डेस चॅम्प्स इलिसिस' येथील भाडे 1,478 डॉलर (1.06 लाख रुपये) प्रतिचौरस फूट असून, या बाजारपेठेचा क्रमांक चौथा आहे. मिलानमधील "व्हिआ मोन्टेनापोलिवन' ही बाजारपेठ पाचव्या क्रमांकावर असून, तेथील वार्षिक भाडे 1,447 (1.03 लाख रुपये) आहे.

जागेच्या टंचाईमुळे भाडेवाढ
भारतीय बाजारपेठांचा विचार करता गेल्या काही वर्षांपासून जागांच्या भाड्याचा आलेख चढाच आहे. चांगल्या "शॉपिंग मॉल'मध्ये जागांची कमतरता असल्याने प्रसिद्ध आणि मोठे ब्रॅंड मुख्य व्यापारी पेठांमध्ये महत्त्वाच्या जागांचा पर्याय शोधतात. त्यामुळे भाडे वाढत असल्याची नोंद या अहवालात करण्यात आली आहे.

जागतिक बाजारपेठ क्रमांक व वार्षिक भाडे (प्रतिचौरस फुटाचे रुपयांत)
1) 1.97 लाख
"कॉजवे बे (हॉंगकॉंग)

2) 1.61 लाख
अप्पर फिफ्थ ऍव्हेन्यू (यूयॉर्क)

3) 1.23 लाख
न्यू बॉंड स्ट्रीट (लंडन)

4) 1.06 लाख
ऍव्हेन्यू डेस चॅम्प्स इलिसिस (पॅरिस)

5) 1.03 लाख
व्हिआ मोन्टेनापोलिवन (मिलान)

20) 17,045 . 60
खान मार्केट (दिल्ली)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delhis Khan Market is worlds 20th most expensive retail location says report