

Delimitation Bill Rahul Gandhi Opposition
esakal
Rahul Gandhi Delhi : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारकडून मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन विधेयक मंजूर करण्याच्या हालचाली सुरू असताना, या विधेयकाला विरोध करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता असलेल्या पक्षांची यादी समोर आली आहे. मात्र, या बैठकीच्या निमित्ताने इंडिया आघाडीतील मतभेदही पुन्हा एकदा समोर येण्याची चिन्हे आहेत.