शुद्धीवर आले तेव्हा तो अर्धनग्न अवस्थेत उभा होता...

Delivery Agent for Amazon Hypnotises Woman in Noida
Delivery Agent for Amazon Hypnotises Woman in Noida

नवी दिल्ली : ऑनलाइन वस्तू खरेदी केल्यानंतर ती देण्यासाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयने सम्मोहित करून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच शुद्धीवर आल्यामुळे अनुचित प्रकार टळला, अशी तक्रार महिलेने पोलिसांकडे केली आहे.

नोएडा येथील एका 43 वर्षाच्या महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, त्यामध्ये म्हटले आहे की, 'अॅमेझॉनवरून काही दिवसांपूर्वी ऑनलाइन वस्तींची खरेदी केली होती. मात्र, त्यातील काही वस्तू परत पाठवायच्या होत्या. त्यासाठी भुपेंद्र पाल (वय 30) नावाचा डिलिव्हरी बॉय घरी आला होता. त्यावेळी वस्तूंवरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर कस्टमर केअरला फोन करून याबाबतची माहिती दिली. त्यानंतर भुपेंद्र पाल तेथून निघून गेला. परंतु, काही वेळानंतर भुपेंद्र पुन्हा घरी आला. पुन्हा बाचाबाची झाल्यानंतर अचानक शुद्ध हरपली. पण, शुद्ध आली तेव्हा डिलिव्हरी बॉय अर्धनग्न अवस्थेत समोर उभा होता. घाबरून ओरडण्यास सुरवात केली. यामुळे नागरिक गोळा झाले व त्यांनी डिलिव्हरी बॉयची धुलाई केली. यानंतर भुपेंद्र तेथून पळून गेला.'

पोलिस अधिकारी प्रदीप कुमार म्हणाले, 'सोसायटीमध्ये आलेल्या नोंदवही तपासण्यात आली असून, त्यामध्ये त्याने भुपेंद्र पाल असे नाव नोंदविले आहे. त्याच्याविरोधात तक्रार दाखल झाली असून, पुढील तपास करत आहोत.' अॅमेझॉनचे प्रवक्ते म्हणाले, 'ग्राहकांची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे अशा प्रकारांवर त्वरित कारवाई केली जाईल. आम्ही आमच्या डिलिव्हरी सर्व्हस प्रोव्हायडरवर कारवाई करत आहोत. त्याचबरोबर पोलिसही या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com