
उदरनिर्वाह करण्यासाठी डिलिव्हरी बॉयचं काम करणाऱ्या तरुणाच्या मृत्यूने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
कोरोनामुळे आधी नोकरी, नंतर वडील गमावले; मद्यधुंद पोलिसामुळे तरुणाचा मृत्यू
नवी दिल्ली - दिल्लीत दारुच्या नशेत पोलिस कर्मचाऱ्याने त्याच्या कारने एका तरुणाला धडक दिली. यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दिल्लीतील (Delhi) रोहिणी परिसरात शनिवारी रात्री ही घटना घडली. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव सलिल त्रिपाठी (Salil Tripathi) असं असल्याचं समजते. सलिलवर त्याच्या कुटुंबाची जबाबदारी होती. त्याच्या अशा मृत्युने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
बुद्धविहार इथं सलिल त्रिपाठी राहत होता. गेल्या वर्षी त्याने वडिलांना गमावले. नोकरी गेल्यानंतर जंगबहाद्दुर त्रिपाठी यांचे निधन झाल्यानं कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्यांच्या निधनानंतर सलिलवर कुटुंबाची जबाबदारी आली होती. आता सलिलच्या अशा अचानक जाण्यानं कुटुंबासह आंबेडकर परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा: कोरोनाच्या भीतीनं पाच जणांनी घेतलं विष, ३ वर्षांच्या बाळासह आईचा मृत्यू
सलिलच्या वडिलांचे मित्र आणि शेजारी असलेल्या कमलेश गुप्ता यांनीही त्याच्या निधनावर शोक व्यक्त केला. अपघाताच्या १० मिनिटे आधी सलीलने पत्नीला फोनवरून आपण घराजवळच असल्याचं सांगितलं होतं. तसंच थोड्याच वेळात घरी येतोय असंही तो म्हणाला होता, मात्र तो घरी परतलाच नाही. त्यानतंर काही वेळातच त्याचा रस्त्यावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगरमध्ये राहणारे त्रिपाठी कुटुंब मूळचे कमालपूर इथले होते. ४० वर्षांपूर्वी ते दिल्लीला आले. इथं त्यांनी एक लहानसा कारखाना सुरु केला.
जंगबहाद्दुर यांचे मित्र कमलेश यांनी म्हटलं की, सुखी आणि आनंदी असलेल्या त्रिपाठी कुटुंबाला कुणाची नजर लागली कळले नाही. गेल्या वर्षी हृदयविकाराच्या त्रासाने सलिलच्या काकीचे निधन झाले. त्यानतंर सलिलच्या वडिलांचा कोरोनाने मृत्यू झाला. या सगळ्या परिस्थितीत कुटुंबाची जबाबदारी सलिलवर आली होती.
हेही वाचा: शारीरिक संबंधासाठी जोडीदाराची अदलाबदली, मोठ्या रॅकेटचा भंडाफोड
सलिल हा एका हॉटेलात मॅनेजरची नोकरी करत होता. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सलिलाल नोकरी गमवावी लागली. त्यानतंर सलिल काम शोधत होता. परिस्थितीवर मात करण्यासाठी त्याची धडपड सुरु होती. काही महिन्यांपूर्वी त्यानं फूड डिलिव्हरीचे कामही सुरु केले. त्यासोबतच तो नोकरीच्या शोधात होता. मात्र हॉटेल-रेस्टॉरंट कोरोनामुळे बंद होत असल्यानं त्याला हवी तशी नोकरी मिळत नव्हती.
सलिलच्या जाण्यानं कुटुंबावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. रविवारी सकाळी त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानतंर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला असून त्याच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
Web Title: Delivery Boy Killed After Constable Rams Car Into His Bike
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..