चंद्राबाबूंची इमारत तोडण्यास सुरवात; कुटुंबीयांचीही सुरक्षा मागे

वृत्तसंस्था
बुधवार, 26 जून 2019

अमरावती (आंध्र प्रदेश) : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री और तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) अध्यक्ष एन. चंद्रबाबू नायडू यांची इमारत अखेर जमीनदोस्त करण्यास सुरवात झाली आहे. तसेच त्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढच होत असून, आता त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा व्यवस्था कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने केला आहे.

चंद्राबाबूंची अलिशान इमारत तोडण्याचा आदेश देऊन सरकारने त्यांना धक्का दिला होता. मंगळवारी रात्री कारवाई करत त्यांचा इमारतीचा काही भाग तोडण्यात आला. या कारवाईमुळे तेलगू देसम पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. याबरोबरच चंद्राबाबू यांचा मुलगा आणि माजी राज्य मंत्री नारा लोकेश यांना असलेली 'झेड' श्रेणीची सुरक्षा सरकारने रद्द केली असून, ती आता दोन अधिक दोन या स्वरूपात असेल. चंद्राबाबू यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांची सुरक्षा हटविण्यात आली आहे.

चंद्राबाबू राहत असलेली 'प्रजा वेदिका' ही इमारत तोडण्याचा आदेश मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी दिला होता. त्यानुसार लगेच काम सुरू करत मंगळवारी रात्री इमारत तोडण्यास सुरवात करण्यात आली. विरोधी पक्षनेत्याचे निवासस्थान म्हणून 'प्रजा वेदिका'ला दर्जा द्यावा, अशी मागणी चंद्राबाबूंनी सरकारकडे केली होती. पण तिकडे दुर्लक्ष करून शनिवारी ही इमारत ताब्यात घेण्यात आली. तेलुगू देसमच्या सत्ताकाळात आंध्र प्रदेश राजधानी क्षेत्र विकास प्राधिकरणामार्फत (एपीसीआरडीए) 'प्रजा वेदिका' ही इमारत बांधण्यात आली होती. पाच कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या इमारतीचा वापर मुख्यत्वे पक्षाच्या बैठकांसाठी होत होता. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: demolition-praja-vedike-chandrababu-naidu-bunglow-was-constructed-previous-government