LokSabha 2019 नोटाबंदीने बेरोजगारी वाढली 

Rahul Gandhi
Rahul Gandhi

अहमदाबाद (पीटीआय) : प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा करण्याचे नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्‍वासनावर आज कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी खरपूस समाचार घेतला. गेल्या साडेचार वर्षांत कोणाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा झाले, असा सवाल करत नोटाबंदीमुळे बेरोजगारी वाढली, अशी टीका त्यांनी केली. कॉंग्रेस कार्यकारी समितीची बैठक झाल्यानंतर गांधीनगर जिल्ह्यात आयोजित सभेत राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या धोरणावर हल्लाबोल केला. 

जीएसटी हा गब्बर सिंह टॅक्‍स असल्याची टीका राहुल गांधी यांनी या वेळी केली. जीएसटीची अंमलबजावणी झाली असली तरी व्यापारी अजूनही संभ्रमात आहे. आपल्यापैकी कोणाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा झाले, अशी विचारणा राहुल गांधी यांनी उपस्थित नागरिकांना केली. पुलवामा हल्ल्यासंदर्भात बोलताना राहुल गांधी म्हणाले, की पुलवामाचा हल्ला दहशतवादी मसूद अजहरने घडवून आणला. परंतु, भाजप सरकारने आणि वाजपेयी सरकारने याच मसूद अजहरला कंधारला पोचवले होते. अजित डोवाल हे मसूदला घेऊन गेले होते. ज्या मिराज विमानांनी पाकिस्तानात हल्ले केले, ते एचएएलने तयार केले आहे. त्याच एचएएलला राफेल विमानाचे कंत्राट दिले नाही. हे कंत्राट अनिल अंबानींच्या कंपनीला दिले आणि ते कागदी जहाजदेखील तयार करू शकत नाही. 

देशातील प्रत्येक संस्थेवर हल्ले केले जात आहेत. जनतेत फूट पाडली जात आहे, द्वेष पसरवला जात आहे. मूळ मुद्दे वेगळेच आहे. सर्वात मोठा मुद्दा हा बेरोजगारीचा आहे. वेगवेगळ्या राज्यांत युवक रोजगारासाठी भटकंती करत आहेत. नरेंद्र मोदी हे देशातील सर्वात 15 श्रीमंतांचे साडेतीन लाख कोटी रुपये कर्ज माफ करतात, मात्र शेतकऱ्यांचा एक रुपयाही माफ करत नाहीत. पीकविमा योजनेचा फायदादेखील त्याच पंधरा लोकांच्या कंपनीला मिळतो. तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या काळात आम्ही दहा दिवसांत कर्जमाफीचे आश्‍वासन दिले होते. सरकार स्थापन होताच कर्ज माफ केले. गुजरातमध्ये शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू शकलो नाहीत, याचे दु:ख आहे. 

नीरव मोदी, चोक्‍सीला रांगेत पाहिले का 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणालाही विश्‍वासात न घेता नोटाबंदीचा निर्णय घेतला. गुजरातच्या लहान व्यापाऱ्यांचे कंबरडे या नोटाबंदीने एका दिवसात मोडले गेले. कोट्यवधी लोक बेरोजगार झाले. ते म्हणतात, की मी काळ्यापैशाविरुद्ध लढत आहे. परंतु नोटाबंदीनंतर बॅंकेबाहेर लागलेल्या रांगेत नीरव मोदी, मेहुल चोक्‍सी, अनिल अंबानी किंवा एखादा काळा पैसावाला पाहिला का, असा सवालही राहुल यांनी केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com