National Dengue Day : देशाला डेंगीच्या आजाराचा ‘डंख’; २०२२ मध्ये एक लाखांहून अधिक रुग्णांची नोंद

डेंगी तज्ज्ञ नीलिका मालविगे म्हणाल्या, की डेंगीवर लस विकसित करण्यात डेंगीच्या विषाणुच्या वेगवेगळ्या प्रकारांचे मुख्य आव्हान आहे.
dengue one lakh patients recorded in 2022 health doctor
dengue one lakh patients recorded in 2022 health doctorsakal

नवी दिल्ली : भारतात दशकभरापासून डेंगींच्या प्रादुर्भावात वाढ झाली असून डासांपासून होणाऱ्या या आजारांविरुद्ध अधिक जोमाने लढा देण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. डेंगीच्या आजाराबद्दल जागृती करण्यासाठी दरवर्षी १६ मे हा भारतात राष्ट्रीय डेंगी दिन म्हणून साजरा केला जातो.

‘लॅन्सेट’ या प्रसिद्ध नियतकालिकात प्रकाशित झालेल्या माहितीनुसार भारतात जानेवारी ते ऑक्टोबर २०२२ दरम्यान डेंगीच्या सुमारे एक लाख दहा हजार ४७३ रुग्णांची नोंद झाली. यापूर्वी २०१८ मध्येही एवढेच रुग्ण नोंदविले गेले होते. डेंगीच्या वाढत्या धोक्यानंतरही त्यावर अद्याप लस उपलब्ध नसून व इतर उपचार अद्याप सर्वांपर्यंत पोचू शकले नाहीत, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.

dengue one lakh patients recorded in 2022 health doctor
Dengue Precautions : वर्षभरानंतर पाणी मिळाले तरी अंड्यातून पुन्हा अळी तयार! डेंग्यूची अशी घ्या खबरदारी

डेंगी तज्ज्ञ नीलिका मालविगे म्हणाल्या, की डेंगीवर लस विकसित करण्यात डेंगीच्या विषाणुच्या वेगवेगळ्या प्रकारांचे मुख्य आव्हान आहे. त्यामुळे सर्वांना समान फायदा होईल, अशी लस विकसित करणे खूप अवघड आहे. डेंगीच्या तीव्र संसर्गाच्या काळात आजाराचा विषाणू वेगाने विकसित होत असल्याने संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावू शकतो.

सॅनोफी या फ्रेंच कंपनीने विकसित केलेल्या डेंगीवरील पहिल्या नोंदणीकृत लशीची क्षमता डेंगीच्या सिरोटाईप दोन प्रकाराविरुद्ध खूपच कमी असल्याचे व तिच्यामुळे डेंगीचा यापूर्वी संसर्ग न झालेल्या मुलांना तो अधिक तीव्रतेने होऊ शकत असल्याचेही निदर्शनास आले. त्याचप्रमाणे ताकेदा या जपानी औषध कंपनीच्या डेंगी लशीची क्षमताही डेंगीच्या सिरोटाइप ३ प्रकाराविरुद्ध कमी असल्याचे आढळले.

dengue one lakh patients recorded in 2022 health doctor
Health Care : गर्भधारणा टाळण्यासाठी Emergency Pills घेणे सुरक्षित आहे का? डॉक्टर सांगतात...

बंगळूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) मधील संशोधकांनी नुकत्याच केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की डेंगी विषाणूची ‘नाट्यमय’ उत्क्रांती झाली आहे. त्यामुळे, भारतात आढळणाऱ्या डेंगीच्या प्रकारांना लक्ष्य करणारी लस बनविण्याची गरज आहे.

निम्म्या जगाला डेंगीचा धोका

जागतिक आरोग्य संघटनेच्या मतानुसार जवळपास निम्म्या जगाला डेंगीचा धोका आहे. दरवर्षी जगभरातील १० ते ४० कोटी लोकांना डेंगीचा संसर्ग होतो. त्यापैकी ३४ टक्के संसर्ग भारतात आढळतो. भारतातील सर्वच राज्यांत डेंगी स्थानिक असून विषाणुचे चारही प्रकार या राज्यांत आढळतात, अशी माहिती केरळमधील तिरुअनंतपुरममधील राजीव गांधी जैवतंत्रज्ञान केंद्रातील वैज्ञानिक अरुण शंकरदास यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com