Supreme Court on DCM Post: 'हे संविधानात नाही, मात्र...', उपमुख्यमंत्री पदाविरोधात दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Supreme Court on DCM Post: उपमुख्यमंत्रीपद हे घटनाबाह्य ठरवत बरखास्त करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. खंडपीठाने म्हटले की, 'हे पद संविधानात नाही, पण ते याच्या विरोधातही नाही'.
Supreme Court on DCM Post
Supreme Court on DCM PostEsakal

उपमुख्यमंत्रीपद हे घटनाबाह्य ठरवत बरखास्त करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले की, हे पद संविधानात नसले तरी ते कोणत्याही नियमाचे उल्लंघन करत नाही. अशाप्रकारे उपमुख्यमंत्री पद रद्द करण्याची मागणी करणारी जनहित याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.(Supreme Court on DCM Post)

राज्यघटनेत उपमुख्यमंत्री पदाचा उल्लेख नसला तरी न्यायालयाने याबाबत मोठा निर्णय दिला आहे. मात्र या पदावर सत्ताधारी पक्षाच्या किंवा आघाडीच्या कोणत्याही पक्षाच्या नेत्याची नियुक्ती करणे बेकायदेशीर नाही. यामुळे घटनेतील कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन होत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

Supreme Court on DCM Post
Supreme Court : Uddhav Thackeray यांच्या मागणीवर न्यायालयाने दिला निर्णय | Pune

मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने सांगितले की, उपमुख्यमंत्री हा आमदार आणि मंत्री असतो. सत्ताधारी पक्षाच्या किंवा आघाडीच्या कोणत्याही पक्षाच्या नेत्याचा आदर व्हावा म्हणून त्यांना उपमुख्यमंत्री म्हटले जाते. घटनेत या पदाचा उल्लेख नसला तरी त्यामुळे संविधानाचे उल्लंघन होत नाही.

'अनेक राज्यांमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीची परंपरा सुरू आहे. यासोबतच पक्ष आपल्या ज्येष्ठ नेत्यांना मान देतात. हे पद असंवैधानिक नाही. यासोबतच उपमुख्यमंत्रीही इतर मंत्र्यांप्रमाणे कॅबिनेट बैठकांमध्ये सहभागी होतात आणि त्यांचा प्रमुख मुख्यमंत्री असतो, असंही खंडपीठानं म्हटलं आहे.

Supreme Court on DCM Post
कर्नाटक विधानसभेत भाजपच्या 'जय श्रीराम'ला काँग्रेस आमदारांनी दिलं 'जय भीम'च्या घोषणेनं उत्तर

अनेक राज्यांनी ही चुकीची परंपरा सुरू केल्याचे याचिकाकर्त्या वकिलांनी म्हटले होते. राज्यघटनेत उपमुख्यमंत्री असे कोणतेही पद नाही. तरीही नेत्यांना हे पद दिले जात आहे. या नियुक्त्या चुकीच्या असल्याचे वकिलांनी सांगितले. याशिवाय अशा नियुक्त्या मंत्र्यांमधील समानतेच्या तत्त्वाच्याही विरोधात आहेत. या युक्तिवादाला उत्तर देताना खंडपीठ म्हणाले, 'उपमुख्यमंत्री हे फक्त मंत्री असतात. उपमुख्यमंत्री हे आमदार असल्यामुळे हे कोणत्याही घटनात्मक नियमाचे उल्लंघन करत नाही. जर तुम्ही कोणाला उपमुख्यमंत्री म्हटले तर ते मंत्र्यासाठी आहे.

Supreme Court on DCM Post
Delhi Farmers Protest: चर्चा निष्फळ! शेतकऱ्यांना रोखण्यासाठी तटबंदी; सोनीपतमध्ये डिझेल-पेट्रोलच्या विक्रीवर निर्बंध, जाणून घ्या महत्त्वाच्या घडामोडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com