"मुंबई आम्हाला द्या, नाहीतर केंद्र शासित प्रदेश म्हणून घोषित करा"

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 28 January 2021

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक सीमा प्रश्नावरुन केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे

बंगळुरु- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक सीमा प्रश्नावरुन केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातच कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी टीका करत मोठं वक्तव्य केलं आहे. मुंबईचा समावेश कर्नाटकमध्ये व्हायला हवा. असे होईपर्यंत मी केंद्र सरकारला विनंती करतो की त्यांनी मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावं, असं ते म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

ट्रॅक्टर रॅली हिंसाचार - योगेंद्र यादव यांच्यासह 20 नेत्यांनी दिल्ली पोलिसांची...

"महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद- संघर्ष आणि संकल्प” पुस्तकाचं बुधवारी उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यावेळी ते बोलताना म्हणाले होते की, कोर्टामध्ये हे प्रकरण असले तरी कर्नाटक सरकारने जाणूनबुजून वादग्रस्त बेळगावचे नाव बदलले. या भागात मराठी बांधवांवर अॅट्रोसिटी होत आहेत. त्यामुळे आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ आणि या भागाला केंद्र शासित प्रदेश म्हणून घोषित करायला लावू. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याने कर्नाटकमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. 

10 दिवस मुंबई धगधगत होती. आज आपल्याला तशीच धग पुन्हा जागवायची आहे, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं होतं. हा कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र आहे. तुम्ही महाराष्ट्रातच आहात. कर्नाटक सरकार उर्मटपणाने एक एक पाऊल टाकत आहे. एखादं प्रकरण कोर्टात गेल्यानंतर काही करायचं नसतं, तो कोर्टाचा अपमान ठरतो. पण तरीही बेळगावचं नामांतर करण्यात आलं. त्याला उपराजधानी केली गेली. विधीमंडळाचं अधिवेशन केलं जातं. हा न्यायालयाचा अपमान नाही का? असा प्रश्न उपस्थित उद्धव ठाकरेंनी केला होता. 

अयोध्येतील मशिदीत नमाज पढण्याला 'हराम' म्हणणाऱ्या ओवेसींना ट्रस्टनं...

आपण ज्याप्रकारे कायद्याचा विचार करतो तसं कर्नाटक सरकार करत नाही. हा विषय केवळ तेवढ्यापुरता बोलण्याचा नाही. कर्नाटकमध्ये कोणत्याही पक्षाचं सरकार असो, कोणीही मुख्यमंत्री असो. मराठी लोकांवर अत्याचार करायचा यावर त्याचं दुमत नसतं. त्याचप्रमाणे हा भूभाग जो कर्नाटकव्याप्त आहे तो माझ्या राज्यात आणणारच असं एकत्रितपणे लढलो तर हा प्रश्न सुटेल, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy CM Laxman Savadi Mumbai included Karnataka Union Territory