अयोध्येतील मशिदीत नमाज पढण्याला 'हराम' म्हणणाऱ्या ओवेसींना ट्रस्टनं सुनावलं!

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 28 January 2021

एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी अयोध्येत बनणाऱ्या मशिदीत नमाज पढण्याला 'हराम' म्हटलं आहे.

नवी दिल्ली- एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी अयोध्येत बनणाऱ्या मशिदीत नमाज पढण्याला 'हराम' म्हटलं आहे. यावर मशिद ट्रस्टने पलटवार केला आहे. अयोध्या मशिद ट्रस्टचे सचिव आणि इंडो इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनचे अतहर हुसैन यांनी ओवैसी यांचे वक्तव्य राजकारणातून प्रेरित असल्याचं म्हटलं. आहे.  

टाईम्स ऑफ इंडिया या वृत्त संस्थेशी बोलताना अतहर हुसैन म्हणाले की, या संपूर्ण जगात जेथे अल्लाहासाठी नवाज पढले जाते, ती जागा हराम असू शकत नाही. ओवैसी ज्या भागातून येतात, तेथे 1857 मध्ये झालेल्या स्वातंत्र्याच्या पहिल्या लढाईची झळ पोहोचली नव्हती. अशीही शक्यता आहे की ओवैसींच्या पूर्वजांनी 1857 च्या ब्रिटिश शासनाविरोधात झालेल्या विद्रोहात भाग घेतला नसेल. 

जय श्रीराम घोषणेविरोधात ममतांचा निंदा प्रस्ताव? काँग्रेस, सीपीएमचा पाठिंबा नाही

ट्रस्टने केली 1857 पहिल्या स्वातंत्र्य लढ्याची आठवण

अवधला विद्रोहाचे केंद्र म्हणत अतहर हुसैन यांनी म्हटलं की, अयोध्येत बनत असलेले इंडो इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनचे हे केंद्र अहमदुल्लाह शाह यांना समर्पित असेल. त्यांनी फैजाबादला ब्रिटिशांच्या शासनापासून जवळपास 1 वर्षापासून मुक्ती मिळवून दिली होती. हुसैन यांनी ओवैसींना प्रश्न केला आहे की, अहमदुल्लाह शाह यांच्या बलिदानाच्या सन्मानार्थ या सेंटरला त्यांच्या नावावर अहमदुल्लाह शाह असं नाव ठेवलं आहे, मग आम्हीपण 'हराम' आहोत आहे!

माजी आमदार मोटे, खासदार राजेनिंबाळकर एकाच व्यासपीठावर! नव्या राजकीय समीकरणाची...

एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले होते

ओवैसी यांनी मंगळवारी कर्नाटकच्या बीदरमध्ये म्हटलं होतं की, अयोध्येच्या धन्नीपुरमध्ये बनवली जाणारी मशिद इस्लामच्या सिद्धांताच्या विरोधात आहे. याला मशिद म्हटलं जाऊ शकत नाही. त्यामुळे या मशिदीचे निर्माण करण्यासाठी डोनेशन देणे आणि याठिकाणी नमाज पढणे दोन्ही हराम आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: asasuddin owaisi donating praying ayodhya masjid haraam mosque hits back