लैंगिक शोषण प्रकरणी शिक्षा भोगणारा राम रहिम पॅरोलवर बाहेर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लैंगिक शोषण प्रकरणी शिक्षा भोगणारा राम रहिम पॅरोलवर बाहेर

गुरमीत राम रहिमने 21 दिवसांसाठी इमर्जन्सी पॅरोलसाठी अर्ज केला होता.

लैंगिक शोषण प्रकरणी शिक्षा भोगणारा राम रहिम पॅरोलवर बाहेर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

चंदिगड - हरयाणातील (Haryana) रोहतकमध्ये (Rohtak) सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहिमला (Gurmeet ram rahim) पॅरोल मिळाला आहे. 48 तासांचा पॅरोल मिळाल्यानंतर सकाळी सहाच्या सुमारास राम रहिमला बाहेर काढण्यात आलं. आजारी असलेल्या आईला भेटण्यासाठी राम रहिम गुरुग्रामला (Gurugram) गेला आहे. तिथे मानेसरमधील एका फार्म हाउसवर तो थांबला असल्याचं समजते. राम रहिमच्या आईला गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. आईला भेटण्यासाठी राम रहिमने पॅरोलची मागणी केली होती. (dera-chief-ram-rahim-get-parole)

गुरमीत राम रहिमने 21 दिवसांसाठी इमर्जन्सी पॅरोलसाठी अर्ज केला होता. त्यावर वाद निर्माण झाला होता. हरयाणातील शिख गुरुद्वारा मॅनेजमेंट कमिटीने राज्य सरकारकडे अपील केलं आहे की, राम रहिमला पॅरोल देण्यात येऊ नये. मॅनेजमेंट कमिटीचे अध्यक्ष संत बलजीत सिंह दादूवाल यांचे म्हणणे आहे की, गुरमीत राम रहिमला पॅरोल देणं हे धोका पत्करण्यापेक्षा कमी नाही.

हेही वाचा: ब्लॅक फंगस आव्हान, मुलांना वाचवणं गरजेचं; मोदी झाले भावूक

काही दिवसांपुर्वी गुरमीत राम रहिमची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्याला रोहतकमधील PGI मध्ये दाखल केलं होतं. याठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसंच त्याच्यासाठी स्पेशल वॉर्डची व्यवस्थाही करण्यात आली आहे. रोहतकच्या ज्या सुनारिया तुरुंगात राम रहिमला ठेवण्यात आलं आहे तिथल्या अनेक कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहिम 2017 पासून तुरुंगात बंद आहे. राम रहिमवर लैंगिक शोषण, पत्रकाराची हत्या यासारखे गुन्हे असून त्यात शिक्षा सुनावण्यात आली आहे. य़ाआधीही अनेकदा त्याने पॅरोलसाठी अर्ज केला होता. मात्र त्याला पॅरोल नाकारण्यात आला होता. आता आईवर उपचार सुरु असताना तिची भेट घेण्यासाठी 48 तासांच्या पॅरोलवर त्याला बाहेर सोडण्यात आलं आहे.

loading image
go to top