ब्लॅक फंगस आव्हान, मुलांना वाचवणं गरजेचं; मोदी झाले भावूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ब्लॅक फंगस आव्हान, मुलांना वाचवणं गरजेचं; मोदी झाले भावूक

ब्लॅक फंगस आव्हान, मुलांना वाचवणं गरजेचं; मोदी झाले भावूक

नवी दिल्ली - भारतात कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेसोबत ब्लॅक फंगस (Black Fungus) म्हणजेच म्युकरमायकोसिसचा (Mucormycosis) धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राने राज्यांना ब्लॅक फंगसच्या रुग्णांची नोंद महामारी अंतर्गत करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Pm Narendra Modi) शुक्रवारी त्यांच्या वाराणसी या मतदारसंघातील डॉक्टरांसोबत संवाद साधला. यावेळी मोदी भावूक झाले. मोदी म्हणाले की, कोरोनाविरोधातील या लढ्यात आपण आपल्या जवळच्या अनेक लोकांना गमावलं आहे. ब्लॅक फंगस हे सध्या आव्हान आहे. तसंच लहान मुलांना कोरोनापासून वाचवणं गरजेचं असल्याचंही मोदींनी म्हटलं. (PM Modi emotional during meeting with varanasi doctors)

मोदींनी डॉक्टरांशी संवाद साधताना म्हटलं की, मी काशीचा एक सेवक असून इथल्या प्रत्येक नागरिकाचे आभार मानतो. विशेषत; आपले डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेलं काम कौतुकास्पद आहे. या कोरोनाने आपल्यापासून जवळच्या व्यक्तींना हिरावून घेतलं आहे. त्या सर्वांना मी श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे.

हेही वाचा: कोरोनाची दुसरी लाट तरुणांसाठी ठरली घातक

वाराणसीतील डॉक्टरांशी बोलताना मोदी म्हणाले की, कोरोनावर नियंत्रण राखण्यात वाराणसीने यश मिळवलं आहे. मात्र आता वाराणसी आणि पूर्वांचलमधील गावांना वाचवायला हवं. पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटलं की, जिथं आजार तिथं उपचार हा मंत्र फॉलो करायचा आहे.

ब्लॅक फंगसचा उल्लेख करताना मोदी म्हणाले की, या आजारापासून सर्वांनी सावध रहायला हवं. संकटाच्या या काळात जनतेची नाराजी पत्करावी लागत आहे. मात्र आपल्याला आपलं काम करत रहायचं आहे आणि त्यांचे दु:ख कमी करायचं आहे.

loading image
go to top