तुरुंगात असलेला गुरमीत राम रहीम हा खोटा, न्यायालयात अजब याचिका दाखल

gurmeet ram rahim
gurmeet ram rahim esakal

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात एक अजब याचिका दाखल करण्यात आली आहे. रोहतक तुरुंगात असलेला गुरमीत राम रहीम हा खोटा आहे, तो खरा डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत सिंग नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. मूळ डेरा प्रमुखाचे अपहरण करण्यात आल्याचे याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवर सोमवारी हायकोर्टात सुनावणी होणार आहे.(dera sacha sauda chief gurmeet ram rahim fake who in jail and petition in hc panchkula big allegation)

gurmeet ram rahim
VIDEO : भाजप खासदारानं शेअर केला राहुल गांधींचा 'फेक' व्हिडिओ

चंदीगडचे रहिवासी अशोक कुमार आणि डेराच्या सुमारे डझनभर अनुयायांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. डेराच्या गादीवर बसण्यासाठी मूळ डेरा प्रमुखाचे अपहरण करून हत्या करण्यात आली किंवा त्याला ठार मारले जाईल, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

ज्या डेरा प्रमुखाला तुरुंगात ठेवण्यात आले आहे, तो बनावट डेरा प्रमुख आहे. हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत हरियाणा सरकार, हनीप्रीत आणि सिरसा डेरा प्रशासक पीआर नैन यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

मूळ डेरा प्रमुखाचे राजस्थानमधील उदयपूर येथून अपहरण करण्यात आले होते आणि आता खऱ्या डेरा प्रमुखाच्या जागी बनावट व्यक्ती आणण्याची योजना सूत्रांकडून मिळाली असल्याचे याचिकाकर्त्यांने म्हटले आहे.

gurmeet ram rahim
धार्मिक स्वातंत्र्यावरील अमेरिकन सरकारचा अहवाल भारतानं फेटाळला

याचिकेनुसार, याचिकाकर्त्यांसह इतर अनुयायांना डेरा प्रमुखाच्या व्यक्तिमत्त्वात झालेले विविध बदल लक्षात आले. उंची एक इंच वाढली होती, बोटांची लांबी आणि पायाचा आकारही वाढला होता. सध्याच्या पॅरोल कालावधीत कथित डेरा प्रमुख किंवा डमी व्यक्तीने प्रकाशित केलेले व्हिडिओ आणि छायाचित्रे पाहिल्यावर स्पष्टपणे दिसून आले की त्याच्या चेहऱ्यावर आणि हातावर मेकओव्हर किंवा मास्क होता जो व्हिडिओवरून लक्षात येते.

gurmeet ram rahim
देशभरात भाजपचे ‘हर घर तिरंगा’

इतकेच नाही तर कथित डेरा प्रमुख/डमी व्यक्ती आपल्या गावकऱ्यांना भेटत असताना त्याच्या जुन्या मित्रांनाही ओळखू शकली नाही, असे याचिकेत म्हटले आहे. न्यायमूर्ती करमजीत सिंह सोमवारी या याचिकेवर सुनावणी करणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com