Desh : दिल्लीत घातपाताचा कट उधळला; दोघांना अटक

जन्मठेप भोगणारा तुरुंगाबाहेर पकडला !
delhi police
delhi police Sakal

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनापूर्वी राजधानी दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याचा मोठा कट दिल्ली पोलिसानी उधळून लावताना दोन संशयित अतिरेक्यांची धरपकड केली आहे. यातील एक जण तर जन्मठेपेची शिक्षा झालेला असल्याने तो कारागृहावर कसा आणि कधी आला या विचाराने पोलीस यंत्रणा चक्रावली आहे.

जगजीतसिंग उर्फ ​​जग्गा (२९) हा उत्तराखंडमधील उधमसिंग नगरचा रहिवासी आहे तर नौशाद सईद (५६) हा दिल्लीतलाच रहिवासी आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत घातपात घडवून आणण्याचा कारस्थानाला प्रत्यक्ष रूप देण्यासाठी हे दोघे कार्यरत होते.

दोघांचेही लागेबांधे कॅनडातील खनिष्ठांनी संघटना तसेच पाकिस्तानच्या आयएसआय या दहशतवादी गुप्तहेर संस्थेबरोबर असल्याचे पुरावे मिळाले आहेत. दिल्ली पोलिसांच्या विशेष दहशतवाद विरोधी पथकाकडून संशयित दोन्ही आरोपींकडून तीन पिस्तूल आणि 22 जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांना उत्तर पश्चिम दिल्लीतील जहांगीरपुरी परिसरातून पकडण्यात आले. जग्गा याचे कॅनडातील खलिस्तानी दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. बंबीहा ग्रुपशी जोडलेल्या अतिरेक्यांबरोबर जग्गा संपर्कात होता. नौशाद हा गजाआड असलेला अट्टल गुन्हेगार आहे

आणि त्याला “तुरुंगाबाहेरून” पकडण्यात आले आहे. तो आणि त्याचे काही साथीदार यापूर्वी हरकत-उल-अन्सार या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. नौशादला दोन खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. यासोबतच स्फोटक कायदा प्रकरणात नौशाद हा गेली 10 वर्षे तुरुंगात आहे. मात्र तो तुरुंगातून कसा बाहेर आला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com