संसदेच्या आवारातून संशयित व्यक्ती ताब्यात; सापडली कोडवर्ड असलेली चिठ्ठी

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 26 August 2020

संसद भवनच्या जवळ बुधवारी एक संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.

नवी दिल्ली- संसद भवनच्या जवळ बुधवारी एक संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. संशयित व्यक्ती जवळ एक कागद सापडला आहे. सध्या इंटेलिजेंस ब्यूरोचे (आयबी) अधिकारी त्यांची चौकशी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संशयिताला विजय चौकातून ताब्यात घेण्यात आले आहे. कामावर तैनात असणाऱ्या सीआरपीएफ जवानांनी या व्यक्तीला पडकले आहे. संसद मार्ग पोलिस स्टेशनमध्ये त्याची चौकशी केली जात आहे. 

रशियाच्या व्हॅक्सिनसाठी भारताची तयारी? वाचा आरोग्य मंत्रालय काय म्हणते 

संशयित व्यक्ती संसद भवनाच्या आवारात फिरत होता. सीआरएफ जवानांना त्याच्या हालचाली संदिग्ध वाटल्याने त्याला पकडण्यात आले. यावेळी संशयित व्यक्ती वेगवेगळी माहिती देऊ लागला. त्याच्याजवळ एक कागद सापडला आहे. त्यांच्यात कोडवर्डमध्ये काही लिहिण्यात आले आहे. त्याच्याजवळ दोन ओळखपत्र सापडले आहेत. एक आधार कार्ड आणि दुसरे ड्राईविंग लाईसेंस. दोन्ही ओळखपत्रांवर वेगवेगळी नावे आहेत.  ड्राईविंग लाईसेंसवर त्याचे नाव फिरदोस आहे, तर आधार कार्डवर मंजूर अहमद अहंगेर असं आहे. 

संशयित व्यक्तीने स्वत:ला रथसून बीरवाह, बडगावचा रहिवाशी असल्याचं सांगितलं आहे. त्याच्याजवळ एक बॅगही मिळाली आहे. चौकशीमध्ये त्याने सांगितले की, 2016 मध्ये तो दिल्ली फिरण्यासाठी आला होता. त्यानंतर त्याने सांगितले की, तो लॉकडाऊनमध्ये येथे आला होता. दिल्लीतील पत्ता सांगताने त्याने कधी जामिया, नंतर निजामुद्दीन तर कधी जामा मशिद भागात राहत असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे व्यक्तीवरील संशय वाढला असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.

भारतात कोरोना का वाढतोय? ICMR ने सांगितलं कारण

दरम्यान, गेल्या शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी आईएसआईएसशी संबंधित एका दहशतवाद्याला अटक केली होती. त्याच्याजवळ 15 किलो स्फोटके सापडली होती. पकडण्यात आलेला दहशतवादी आत्मघातली हल्ल्याच्या तयारीत होता. दहशतवाद्याने आईईडीशी संबंधित 2 प्रेशर कुकर बॉम्ब बनवले होते. दोन्ही बॉम्बमध्ये 15 किलो स्फोटके ठेवण्यात आली होती. या स्फोटकांना डिफ्यूज करण्यासाठी एक एनएसजीची टीम आली होती. बुद्धा जयंती पार्कमध्ये ऑटोमॅटिक रोबोट मशिनच्या साह्याने दोन्ही बॉम्बना मातीमध्ये सुरक्षित घेऊन जाण्यात आले, त्यानंतर त्यांना निष्क्रीय करण्यात आहे. दहशतवाद्याच्या घरुन स्फोटकांचे जॅकेट जप्त करण्यात आले आहे. दहशतवादी दिल्लीमध्ये गर्दीच्या ठिकाणी स्फोट घडवून आणणार होता. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा हल्ला टळला आहे. 

(edited by-kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Detention of a suspect from the premises of Parliament Found code word note