श्रीनगर - ‘जड अंतःकरणाने दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली. दहशतवादापुढे देश झुकणार नाही, ठेचणार. दहशतवाद्यांना सोडणार नाही,’ असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी दिला..पहलगाम येथील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना शहा, जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथील पोलिस नियंत्रण कक्षात बुधवारी सकाळी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी मृतांच्या नातेवाइकांशी संवाद साधला. यावेळी मृतांच्या नातेवाइकांनी आक्रोश करत गृहमंत्री शहा यांच्याजवळ भावना मांडल्या..या भेटीबद्दल भावना व्यक्त करताना शहा यांनी समाज माध्यमांतील पोस्टमध्ये म्हटले आहे की, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल सर्व देश हळहळ व्यक्त करत असून, हे दुःख शब्दांत व्यक्त करता येण्यासारखे नाही.‘पीडितांच्या कुटुंबीयांना आणि सर्व देशवासीयांना आश्वासन देऊ इच्छितो की, निरपराध लोकांना मारणाऱ्या दहशतवाद्यांना अजिबात सोडणार नाही, देश दहशतवादापुढे झुकणार नाही,’’ असा इशारा शहा यांनी दिला..यानंतर अमित शहा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, बैसरन येथे पाहणी केली. पहलगाम येथील बैसरन येथे ज्याठिकाणी मंगळवारी दहशतवाद्यांनी ज्या ठिकाणी पर्यटकांवर हल्ला केला, त्याठिकाणी गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी पाहणी केली. संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांनी शहा यांना, पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा घटनाक्रम सांगितला.दरम्यान, पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना काश्मीरच्या सरकारी कर्मचाऱ्यांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांनी रुग्णालयात जावून जखमींची विचारपूस केली आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून धीर दिला. रुग्णालय प्रशासनाकडून उपचारासंदर्भात माहिती घेतली..सुप्रीम कोर्टाकडून निषेधनवी दिल्ली - ‘या अमानुष आणि निर्दयी कृत्याने सर्वच हादरून गेलो आहोत. दहशतवाद किती निर्दयी आणि अमानवी आहे याची जाणीव या हल्ल्याने तीव्र केली आहे.’ असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाने आणि सर्वोच्च न्यायालयातील वकिलांनी, पहलगाम हल्ल्याचा निषेध नोंदविला.त्याचप्रमाणे या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याचप्रमाणे पहलगाम हल्ल्याचा निषेध करणारा ठरावही यावेळी एकमताने मंजूर करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयातील बार असोसिएशनने देखील या कृत्याचा निषेध केला आहे..दोन जणांना अटक पहलगाममधील हल्ल्यानंतर विविध सुरक्षा दलांनी शोधमोहीम हाती घेतली असून अनंतनाग जिल्ह्यात संयुक्त पथकाने वासीम अहमद शाह आणि अदनान अहमद बेग यांना अटक केली. काश्मीरमध्ये आलेल्या राजस्थानमधील दाम्पत्यावर १८ मे रोजी झालेल्या हल्ल्यात या दोघांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या हल्ल्यासंदर्भातही त्यांची चौकशी केली जाणार असल्याचे स्थानिक सूत्रांनी सांगितले. या दोघांकडून काही जिवंत काडतुसे, एक बाँब आणि एके-४७ रायफलीच्या १२० गोळ्या हस्तगत केल्याचेही सूत्रांनी सांगितले..‘एअर इंडिया’, ‘इंडिगो’ कडून अतिरिक्त विमानेपहेलगाम हल्ल्यानंतर ‘एअर इंडिया’ आणि ‘इंडिगो’ने बुधवारी श्रीनगर ते दिल्ली आणि श्रीनगर ते मुंबई या मार्गावर पर्यटकांसाठी चार अतिरिक्त विमानांची घोषणा केली. ‘सध्याची परिस्थिती पाहता, एअर इंडिया बुधवारी श्रीनगरहून दिल्ली आणि मुंबईसाठी दोन अतिरिक्त विमाने उड्डाण करतील,’ असे एअर इंडियाने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. ‘इंडिगो’च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की बुधवारी श्रीनगरहून दिल्ली आणि मुंबईसाठी दोन अतिरिक्त विमानांचे उड्डाण करण्यात येईल..बारामुल्लात दोन दहशतवादी मारलेश्रीनगर - काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी भागात आज नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन दहशतवाद्यांना जवानांनी गोळीबारात ठार मारत त्यांचा कट उधळून लावला. उरी नाला भागातून जाणाऱ्या दहशतवाद्यांना जवानांनी शरण येण्याचे आवाहन केले होते. मात्र त्यांनी गोळीबार सुरू केला. यानंतर जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात दोन्ही दहशतवादी मारले गेले. या भागात तातडीने शोधमोहिम सुरू करण्यात आली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.