देवेगौडांनी घेतली चंद्रशेखर राव यांची भेट

वृत्तसंस्था
रविवार, 1 जुलै 2018

माजी पंतप्रधान आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते एच. डी. देवेगौडा यांनी आज तेलंगण राष्ट्र समितीचे प्रमुख आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची त्यांच्या निवासस्थान आणि कार्यालय असलेल्या प्रगती भवन येथे भेट घेतली.

हैदराबाद : माजी पंतप्रधान आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते एच. डी. देवेगौडा यांनी आज तेलंगण राष्ट्र समितीचे प्रमुख आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची त्यांच्या निवासस्थान आणि कार्यालय असलेल्या प्रगती भवन येथे भेट घेतली.

या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये देशाच्या विद्यमान राजकीय परिस्थितीबद्दल चर्चा झाली. त्याशिवाय देशात गुणात्मक परिवर्तन आणण्यासाठी बिगरकॉंग्रेस आणि बिगर भाजप आघाडी करण्याबाबतही चर्चा झाली. या बैठकीला स्थानिक पक्षांचे प्रतिनिधी आणि उद्योगमंत्री के. टी. रामाराव उपस्थित होते. प्रगती भवन येथे आल्यानंतर देवेगौडा यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री राव यांनी देवेगौडा यांचे स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. दरम्यान, यापूर्वी कॉंग्रेसचे खासदार टी. सुब्बीरमी रेड्डी यांच्या नातवाच्या लग्नाला देवेगौडा आले होते. 

Web Title: Deve Gowda calls on Telangana CM K Chandrasekhar Rao