देवेंद्र फडणवीस बिहारमध्ये भाजप निवडणूक प्रभारी? केंद्रीय नेत्तृत्व सोपवणार मोठी जबाबदारी?

सुमित बागुल
Friday, 14 August 2020

बिहारमध्ये येऊ घातलेल्या निवडणुकांमुळे बिहारचं राजकीय वातावरण कमालीचं तापलंय.

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे महाराष्ट्राचे विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आता बिहारमध्ये एक मोठी जबाबदारी सोपवली जाणार अशी शक्यता वर्तववली जातेय. येत्या काही काळात बिहारमध्ये निवडणूक आहेत. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांची बिहार भाजप प्रभारी म्हणून निवड होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

कालच भाजप कोअर कमिटीची महत्त्वाची मिटिंग पार पडली. यामध्ये देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. सध्या भूपेंद्र यादव हे बिहारचे विद्यमान भाजप प्रभारी म्हणून काम पाहतायत. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून देवेंद्र फडणवीस यांना मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. अशात येत्या काळात देवेंद्र फडणवीस आणि भूपेंद्र यादव एकत्रितरित्या काम पाहतील अशी सूत्रांकडून माहिती समोर येतेय.  

महत्त्वाची बातमी - गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या सेंट्रल रेल्वेच्या गाड्यांची संपूर्ण यादी 

कोरोनाच्या सावटाखाली निवडणूक 

बिहारमध्ये येऊ घातलेल्या निवडणुकांमुळे बिहारचं राजकीय वातावरण कमालीचं तापलंय. सत्ताधारी आणि विरोधक निवडणुकांच्या निमित्ताने आणखी आक्रमकरीत्या आमनेसामने येतायत. दरम्यान या निवडणुकांवर कोरोनाचंही सावट आहे. कोरोनाच्या सावटामध्ये निवडणूक पार पडणार असल्याने निवडणूक आयोगाने अत्यंत महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. त्यासाठीची तयारीही निवडणूक आयोगाकडून सुरु आहेत. निवडणुकांमध्ये सोशल डिस्टंसिंग नियमाचं पालन केलं जाणार आहे. 

devendra fadanavis might be given big responsibility of party election in charge of bihar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: devendra fadanavis might be given big responsibility of party election in charge of bihar