
मुंबई : गणपती उत्सव २०२० दरम्यान कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस / लोकमान्य टिळक टर्मिनस आणि सावंतवाडी रोड / कुडाळ / रत्नागिरी दरम्यान १६२ विशेष गाड्या चालविणार आहे. या गाड्या पूर्णपणे आरक्षित असतील. दरम्यान, प्रवाशांना बोर्डिंग करतेवेळी, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानावर कोविड-19 संबंधित सर्व नियमांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे :
१. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- सावंतवाडी रोड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (१६ फे-या)
२. लोकमान्य टिळक टर्मिनस - कुडाळ - लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (१६ फे-या)
३. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सावंतवाडी रोड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (१६ फे-या)
INSIDE NEWS : काल पार्थ पवार सिल्व्हर ओक वर गेल्यावर तिथं घडलं काय ?
४. लोकमान्य टिळक टर्मिनस - रत्नागिरी - लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (१६ फे-या)
५. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- सावंतवाडी रोड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (२४ फे-या)
६. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सावंतवाडी रोड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (२४ फे-या)
७. लोकमान्य टिळक टर्मिनस - सावंतवाडी रोड - लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (२६ फे-या)
८. लोकमान्य टिळक टर्मिनस - रत्नागिरी - लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (२४ फे-या)
या सर्व आरक्षित विशेष गाड्यांची संरचनाः १३ शयनयान (स्लीपर क्लास), ६ आरक्षित सामान्य द्वितीय श्रेणी , १ द्वितीय वातानुकूलित (एसी -२ टायर), ४ तृतीय वातानुकूलित (एसी-3 टायर ) डब्बे अशी असेल
आरक्षण : या विशेष गाड्यांसाठी बुकिंग १५.८.२०२० पासून आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू होईल.
list of all the trains that will be run by central railways during ganesh utsav to konkan
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.