उदयनराजे पुन्हा विक्रमी मतांनी निवडून येतील : फडणवीस

वृत्तसंस्था
Saturday, 14 September 2019

तीन महिन्यांपूर्वी निवड होऊनही उदयनराजेंनी राजीनामा दिला. आता पुन्हा नव्याने ते निवडून येतील आणि विक्रमी मते त्यांना मिळतील, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

नवी दिल्ली : तीन महिन्यांपूर्वी निवड होऊनही उदयनराजेंनी राजीनामा दिला. आता पुन्हा नव्याने ते निवडून येतील आणि विक्रमी मते त्यांना मिळतील, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्राचं गेलेलं वैभव फडणवीसांनी कष्ट करुन परत आणलंय : अमित शहा

राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अखेर आज (शनिवार) अखेर भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी त्यांनी भाजप प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, रामदास आठवले आदी नेत उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, की आमच्यासाठी आज खूप आनंदाची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिवाजी महाराजांमुळेच आपण स्वातंत्र्याचा आनंद घेत आहे. प्रत्यक्ष महाराज भाजपमध्ये आल्याने आता अधिक लोकाभिमुख कार्य करण्यासाठी सरकारला मदत होईल. मोदींनी कलम 370 हटविल्यानंतर देशभर आनंद व्यक्त करत आहेत. युवाशक्तीला संघटीत करून त्यांना देशाच्या प्रगतीत सामावून घेऊ. 

आधी फायली कचऱ्याच्या डब्यात जायच्या : उदयनराजे
मुख्यमंत्र्यांशी माझी जुनी मैत्री आहे. आम्ही पहिल्यापासून एक आहोत. त्यांच्या माध्यमातून विकासाची अनेक कामे झाली आहेत. केंद्रात आणि राज्यात एकच सरकार असल्याचा फायदा होतो. कोणाबद्दल मी कधीच वाईट बोलणार नाही. आम्ही दिलेल्या फायली आधी कचऱ्याच्या डब्यात जात होत्या, अशी खंत उदयनराजे यांनी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra Fadnavis believes that Udayanraje will win with huge margin