esakal | नारायण राणे आज अमित शहांची भेट घेणार?
sakal

बोलून बातमी शोधा

Narayan Rane

नारायण राणे आज अमित शहांची भेट घेणार?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- विहंग ठाकूर

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) आज केंद्रीय गृह मंत्री अमित शहा (amit shah) यांची भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. जन आशीर्वाद यात्रेदरम्यान (jan ashirwad yatra) महाराष्ट्र सरकारच्या वतीने बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली, असे नारायण राणेंचे म्हणणे आहे. या संदर्भातच नारायण राणे अमित शहा यांची भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

आज दुपारी केंद्रीय गृह मंत्रालयात ही भेट होणार असल्याची माहिती आहे. केंद्रीय मंत्र्यावर बेकायदेशीर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर केंद्र सरकारने कारवाई करावी अशी मागणी नारायण राणे करणार आहेत.

हेही वाचा: चीन तालिबानला पैसा पुरवेल, याची भीती वाटते का? बायडेन म्हणाले....

मागच्या महिन्यात जनआशीर्वाद यात्रे दरम्यान कोकणात असताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर पोलिसांनी नारायण राणे यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले होते. ज्या दिवशी त्यांना अटक झाली. त्याचदिवशी त्यांना जामीनही मिळाला होता.

हेही वाचा: ठरलं! आगामी निवडणुकांची 'रणनीती' भाजप ठरविणार

नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. शिवसेनेने ठिकठिकाणी नारायण राणेंविरोधात हिंसक आंदोलनं केली होती. नारायण राणेंच्या जुहू बंगल्याबाहेर शिवसैनिक आणि राणे समर्थक भिडले होते.

loading image
go to top