esakal | 'भारतरत्नांची चौकशी करणारे रत्न देशात कुठेही सापडणार नाहीत'; देवेंद्र फडणवीस भडकले
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra_Fadnavis

शेतकरी आंदोलनावर ट्विट करणाऱ्यांमध्ये बॉलिवूड कलाकार, क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांची नावे आहेत. यामध्ये बॉलिवूड अभिनेता अक्षयकुमार, अजय देवगन, लता मंगेशकर, भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा समावेश आहे. ​

'भारतरत्नांची चौकशी करणारे रत्न देशात कुठेही सापडणार नाहीत'; देवेंद्र फडणवीस भडकले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : गेल्या दोन महिन्यांपासून राजधानी दिल्लीच्या बॉर्डरवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला परदेशी सेलिब्रिटींनी वाचा फोडली आणि देशभरात खळबळ उडाली. अनेक बॉलिवूड सेलेब्रिटी सरकारच्या समर्थनार्थ मैदानात उतरले. त्यामुळे सेलिब्रिटींवर ट्विट करण्यासाठी मोदी सरकारने दबाव टाकला होता का असा आरोप विरोधकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सेलिब्रिटींनी ट्विट केल्याप्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे जाहीर केले. यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच भडकले आहेत. 

-  हे वाचा - फक्त 10 मिनिटांत स्मार्टफोनचं चार्जिंग होणार फुल्ल; येतेय नवीन टेक्नॉलॉजी

फडणवीस आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, 'भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे. खरे तर चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मागणी मान्य करणारे यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी केली पाहिजे.'

फडणवीस पुढे म्हणाले की, 'संतापजनक! कुठे गेला मराठीबाणा? कुठे गेला महाराष्ट्रधर्म? भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत. निषेध करावा तितका थोडा! या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

मराठ्यांनी घेतलेला पानिपतचा बदला

दरम्यान, शेतकरी आंदोलनावर ट्विट करणाऱ्यांमध्ये बॉलिवूड कलाकार, क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांची नावे आहेत. यामध्ये बॉलिवूड अभिनेता अक्षयकुमार, अजय देवगन, लता मंगेशकर, भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा समावेश आहे. अमेरिकन पॉप सिंगर रिहाना, पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग आणि पॉर्नस्टार मिया खलिफा यांनी भारतात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी आवाज उठवला. यानंतर परराष्ट्र मंत्रालयानं भलं मोठं निवेदन प्रसिद्ध केलं होतं. 

Success Story: नोकरी सांभाळत 'ती' झाली ‘सीए’; एकत्र कुटुंबाची मिळाली साथ!​

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image