मौनी अमावास्येनिमित्त शाही स्नान उत्साहात

 मौनी अमावास्येनिमित्त शाही स्नान उत्साहात

प्रयगराज- मौनी अमावास्येनिमित्त पवित्र संगमावर स्नानासाठी आज येथे अलोट जनसागर लोटला होता. साधूंनी शाही स्नानाची पर्वणी साधली. कुंभमेळा आणि सोमवारी आलेल्या अमावास्येमुळे भाविकांची गर्दी वाढली होती. 

गंगा, यमुना आणि गुप्त असलेल्या सरस्वतीच्या संगमावर स्नानासाठी पहाटे तीन वाजल्यापासूनच रीघ लागली होती. कुंभनगरीत वाहनांना प्रवेश नसल्यामुळे भाविक लांबून चालत आले होते. त्यानंतर नागा साधूंचे आगमन झाले आणि त्यांनी "हर हर गंगे', "गंगा मय्या की जय'च्या घोषात स्नान केले. सजवलेल्या वाहनांमधून या साधूंचे आगमन झाले. शैवांचे सात, वैष्णवांचे तीन, उदासीनांचे दोन आणि शिखांचा एक, असे तेरा आखाडे स्नानात सहभागी झाले होते. प्रत्येक आखाड्याला स्नानासाठी 30-50 मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता.

मौनी अमावास्या असल्यामुळे अनेक भाविकांनी आज मौनव्रत पाळले. कुंभ मेळ्यात एकूण तीन शाही स्नाने होणार असून, शेवटचे स्नान वसंत पंचमीला (ता. 10 फेब्रुवारी) होईल.

कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून 40 पोलिस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांसह अग्निशामक दलाचे जवान डोळ्यांत तेल घालून सज्ज होते. संपूर्ण कुंभनगरीवर 440 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून नजर ठेवली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सुरक्षा दलांनी उभारलेल्या अडथळ्यांमुळे भाविकांची काही प्रमाणात गैरसोय झाली होती. 

ये कुंभ नही आसान बस इतना समझ लिजिये ठंडा पानी है और डुबकी लगाना है.- रवीश वाजपेयी, कवी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com