

DGCA Bans Power Bank Charging During Flights
Esakal
विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता मोठी बातमी समोर आलीय. डायरेक्टर जनरल ऑफ सिविल एविएशनने विमानात पॉवर बँक चार्जिंक करण्यास आणि सीटच्या पावर सिस्टिमला जोडण्यास बंदी घातलीय. अलिकडेच लिथियम बॅटरीत आग लागल्याची घटना घडली होती. यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. आता पॉवर बँक फक्त हँडबॅगमध्येच ठेवता येणार आहे. मात्र विमानात चार्जिंग करता येणार नाही.