Indian Airlines sakal
देश
Indian Airlines : पाकच्या ‘नो एंट्री’मुळे हवाई प्रवास लांबला; भारतीय विमान कंपन्यांना मार्गदर्शक सूचना
Travel Delays : पाकिस्तानने भारतीय विमान कंपन्यांसाठी हवाई हद्द बंद केल्यामुळे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या. यात योग्य प्रवास सेवा आणि आगमन-प्रस्थान कालावधीविषयी अद्ययावत माहिती पुरवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
नवी दिल्ली : पाकिस्तानने भारतीय विमान कंपन्यांसाठी हवाई हद्द बंद केल्याच्या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) प्रवाशांना योग्य वाहतूक सेवा आणि विमान प्रवासादरम्यान अल्पोपहार सेवांसह आगमन प्रस्थानाच्या वाढीव कालावधीबाबत अद्ययावत माहिती पुरवण्याबाबत मार्गदर्शक सूचना केल्या.

