
झारखंडमधील धनबाद येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलाला अशी शिक्षा देण्यात आली की सर्वांनाच आश्चर्य वाटले आणि संताप आला आहे. एका शिक्षिकेने चौथीच्या वर्गातील मुलाला १० पाने शिव्या लिहिण्यास भाग पाडले. ही घटना धनबादमधील हिल कॉलनी येथील सेंट मेरी शाळेमधील आहे.