
Dipak Borhade: धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी जालन्यात उपोषणाला बसलेले दीपक बोऱ्हाडे यांची भूमिका आता काही अंशी बदलली आहे. एसटी प्रवर्गाला जे ७ टक्के आरक्षण आहे, त्यात वाटेकरी न होता, स्वतंत्र एसटी प्रवर्ग करुन आरक्षण द्यावं, अशी त्यांनी मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोऱ्हाडे यांच्याशी फोनवरुन संवाद साधला.