महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नी मुख्यमंत्र्यांना भेटणार - धनंजय मुंडे

मिलिंद देसाई
सोमवार, 10 डिसेंबर 2018

बेळगाव - जीव गेला तरी चालेल पण सीमावासियांना महाराष्ट्रात घेणारच, अशी ग्वाही देत सीमाप्रश्न निर्णायक वळणावर असल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची विनंती करणार आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.

बेळगाव - जीव गेला तरी चालेल पण सीमावासियांना महाराष्ट्रात घेणारच, अशी ग्वाही देत सीमाप्रश्न निर्णायक वळणावर असल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची विनंती करणार आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे सोमवारी आयोजित केलेल्या महामेळाव्यामध्ये धनंजय मुंडे बोलत होते. मुंडे म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे, पण सीमावासिय अजूनही लढत आहेत. शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले, त्यांचाच वारसा घेऊन सीमावासियांनी लढा सुरू ठेवला आहे. त्यामुळे 63 वर्षांपासून लढणाऱ्या सीमावासियांच्या लढ्याला माझा सलाम असून 70 हुन अधिक जणांनी सीमाप्रश्नी बलिदान दिले आहे. मात्र आजही सीमावासिय पारतंत्र्यातच आहेत.

विरोधीपक्ष नेत्याचीही कर्नाटककडून अडवणूक होते, यावरून मराठी भाषिकांची किती गळचेपी केली जात असेल याची जाणीव झाली असून मी माझ्या माणसांना भेटण्यास आलो आहे. यापुढे कितीही संकटे आली तरी माघार घ्यायची नाही

- धनंजय मुंडे

मुंडे म्हणाले, मी महाराष्ट्रातून केवळ लढाईला पाठिंबा द्यायला नव्हे ,तर लढ्यामध्ये खांद्याला खांदा देऊन लढणार आहे. तुमचे आणि आमचे नाते रक्ताचे असून महाराष्ट्रातील 12 कोटी जनता तुमच्या पाठीशी आहे. लढाई निर्णायक वळणावर आहे अशावेळी आता अधिक तीव्रतेने लढा देऊया सीमाप्रश्नी उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. आता अन्याय सहन होणार नाही

कर्नाटक सरकारची वळवळ बंद करावी लागणार असून महाराष्ट्र सरकारला मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाची जाणीव करून देणार आहे. वकिलांची भेट घ्यावी तसेच पंतप्रधानांची भेट घ्यावी यासाठी प्रयत्न करणार आहे

- धनंजय मुंडे

Web Title: Dhanjay Munde comment