मुस्लिमांविरोधात चिथावणीखोर भाषण; यती नरसिंहानंद यांना अटक

धर्मसंसदेतील या चिथावणीखोर भाषणांची सर्वोच्च न्यायालयाने देखील गंभीर दखल घेतल्यानंतर याप्रकरणी कारवाईला वेग आला आहे.
Yati Narsinghanand
Yati Narsinghanand
Updated on

नवी दिल्ली : हरिद्वार येथील धर्मसंसदेत (Hardwar Dharm Sansad) चिथावणीखोर भाषण केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले महंत यती नरसिंहानंद (Yati Narasimhanand) यांना शनिवारी अटक करण्यात आली. नरसिंहानंद यांनी मुस्लिमांविरोधात शस्त्र हाती घेण्याचे आवाहन केले होते. दरम्यान धर्मसंसदेतील या चिथावणीखोर (Provocative speech) भाषणांची सर्वोच्च न्यायालयाने देखील गंभीर दखल घेतल्यानंतर याप्रकरणी कारवाईला वेग आला आहे. (Dharm Sansad Provocative speech against Muslims Yati Narasimhanand arrested)

चिथावणीखोर वक्तव्याविरोधात हरिद्वार येथील एका कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्यीनं यति नरसिंहानंद यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. तिनं केलेल्या तक्रारीनुसार, गाझियाबाद येथील डासना येथील देवी मंदिराचे महंत यति यांनी मुस्लीम महिलांविरोधात आक्षेपार्ह टिपण्णी केली होती. याप्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ. योगेंद्र सिंह रावत यांनी सांगितलं की, यति नरसिंहानंदविरोधात दाखल झालेल्या तिसऱ्या तक्रारीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी वसिम रिझवी यांच्यानंतर ही दुसरी अटक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.