भगवान बुद्धांनी जगाला जगण्याचा मार्ग दाखवला : मोदी

टीम ई-सकाळ
शनिवार, 4 जुलै 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आषाढ पौर्णिमेच्या निमित्ताने देशवासियांना संदेश दिला. यावेळी त्यांनी भगवान बुद्ध यांनी जगाला दिलेल्या आठ शिकवणीचे स्मरण केले.  

नवी दिल्ली : भगवान बुद्धांनी जगाला जण्याचा मार्ग दाखवला आहे. भगवान बुद्धांची शिकवण विचार आणि क्रिया दोन्हीमध्ये समतोल देणारी आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आषाढ पौर्णिमेच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या. आजचा दिवस आपल्याला शिक्षा देणाऱ्या गुरुला स्मरण करण्याचा दिवस आहे, असे सांगत बुद्धांची शिकवण आपण लक्षात ठेवायला हवी. त्यांनी दिलेले आठ मार्ग हे देशालाच नव्हे तर जगाला दिशा दाखवणारे आहेत, असे मोदींनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आषाढ पौर्णिमेच्या निमित्ताने देशवासियांना संदेश दिला आहे. यावेळी मोदींनी भगवान बुद्ध यांनी जगाला दिलेल्या आठ शिकवणीचे स्मरण केले.  

PM मोदींनी घेतली जखमी वीर जवानाची भेट; आता 21 वर्षांपूर्वीचा फोटो होतोय व्हायरल

मोदी म्हणाले की, आज जग एका कठिण परिस्थितीचा सामना करत आहे. या आव्हानाचा सामना करण्याचे बळ हे भगवान बुद्धांनी दिलेल्या आदर्शावरुन शक्य आहे. भगवान गौतम बुद्धांनी दिलेली शिकवण ही वर्तमान, भूतकाळ आणि भविष्यात उपयुक्त असून आपण त्याचा अवलंब करायला हवा, असा संदेश मोदींनी देशवासियांना दिला.  तत्पूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनमध्ये अंतरराष्ट्रीय बौद्ध परिसंघ (IBC) द्वारा आयोजित समारोहाचे उद्घाटन केले. संस्कृती मंत्रालयाच्या देखरेखीखाली आंतरराष्ट्रीय बौद्ध परिसंघाच्यावतीने धर्म चक्र दिवसाच्या रुपात आषाढ पौर्णिमा साजरी करण्यात येत आहे.  आजच्याच दिवशी भगवान गौतम बुद्धांनी आपल्या पहिल्या पाच शिष्यांना उपदेश दिला होता. हा दिवस जगभरात धर्म चक्र परिवर्तन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 

"इंदिरा गांधींच्या लेह भेटीनंतर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले; आता मोदी काय करतात ते पाहुया?"

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dharma Chakra Day solutions can come from the ideals of Lord Buddha says Narendra Modi