PM मोदींनी घेतली जखमी वीर जवानाची भेट; आता 21 वर्षांपूर्वीचा फोटो होतोय व्हायरल

टीम ई-सकाळ
शनिवार, 4 जुलै 2020

त्यांच्या या भेटीची आणि यावेळी त्यांनी जवानांना भाषणातून दिलेल्या प्रोत्साहनाची सध्या चर्चा सुरु आहे. त्यानंतर आता मोदींचा एक जूना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. 

नवी दिल्ली : भारत-चीन यांच्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC in Ladakh) सध्या तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशांतील तणावपूर्ण परिस्थितीत सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेण्याचे संकेत देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानकपणे लेह-लडाखचा दौरा केल्याचे पाहायला मिळाले. लष्कर, हवाई दल आणि नौदल या तिन्ही दलाचे प्रमुख असलेल्या (चीफ ऑफ डिफेन्स) बिपीन रावत यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लेह लडाख येथील भारतीय लष्करी तळावर जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतला. चीनची आरेरावी सहन करणार नाही, असा इशाराच मोदींनी आपल्या या भेटीतून दिला. त्यांच्या या भेटीची आणि यावेळी त्यांनी जवानांना भाषणातून दिलेल्या प्रोत्साहनाची सध्या चर्चा सुरु आहे. त्यानंतर आता मोदींचा एक जूना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. 

लडाखचे नागरिक खोटं बोलत आहेत का? राहुल गांधींचा मोदींना प्रश्न

मोदींनी पाकिस्तानविरुद्ध झालेल्या कारगील युद्धात जखमी झालेल्या जवानांची त्याठिकाणी जाऊन विचारपूस केली होती. 21 वर्षांपूर्वीच्या या गोष्टीसंदर्भातही आता चर्चा रंगू लागली आहे. लडाख दौऱ्यात मोदींनी जखमी भारतीय जवानांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केल्यानंतर मोदींचा जूना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  मोदींच्या लडाख दौऱ्यानंतर गुजरातमधील सूरतचे आमदार आणि भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष हर्ष सांघवी यांनी मोदींचा 21 वर्षांपूर्वी जखमी जवानाची विचारपूस करतानाचा फोटो आणि लडाख दौऱ्यादरम्यान जवानाची भेट घेत त्याच्या तब्येतीची चौकशी करतानाचा फोटो आपल्या अधिकृत ट्विट अकाउंटवरुन शेअर केलाय. हा फोटो शेअर करताना त्यांनी  'सातत्यपूर्ण वचनबद्धता' या कॅप्शनसह (1999 कारगिल, 2020 लेह) असा उल्लेख केलाय. 

"इंदिरा गांधींच्या लेह भेटीनंतर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले; आता मोदी काय करतात ते पाहुया?"

21 वर्षांपूर्वी भारत-पाकिस्तान यांच्यात कारगिल युद्ध झाले होते. त्यावेळी मोदींनी युद्धात जखमी झालेल्या भारतीय जवानांची भेट घेऊन त्यांची चौकशी केली होती, अशी आठवण भाजपच्या आमदाराने ट्विटरच्या माध्यमातून करुन दिली. त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 15 जून रोजी गलवान खोऱ्यात चिनी सैन्य आणि भारतीय जवानांमध्ये झडप झाली होती. यात  20 जवान शहीद झाले होते तर काही जवान जखमी झाले होते. लडाखला जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सद्यपरिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मोदींनी जखमी जवानांची भेट घेत त्यांची विचारपूस केली.  यापूर्वी मागील वर्षी कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी खुद्द आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन शेअर केली होती. 20 वर्षांपूर्वी जम्मू काश्मीर आणि हिमाचलमध्ये पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना वीर जवानांसोबत एकजूटता दाखवण्याची संधी मिळाली होती, असा उल्लेख मोदींनी केला होता. आपल्या भाषणातही त्यांनी याबद्दल सांगितले होते.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm narendra modi met to injured soldiers ladakh 21 years old Kargil Visit photo viral