Dharmasthala Mass Graves : कर्नाटकातील धर्मस्थळ येथील मृतदेहांच्या सामूहिक दफन प्रकरणामुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. या वादग्रस्त प्रकरणात सतत नवनवीन खुलासे होत असतानाच आता सुजाता भट्ट नावाच्या महिलेने मोठा यू-टर्न घेतला आहे. आपली मुलगी हरवल्याचा दावा करणाऱ्या या महिलेने आता तो खोटा असल्याचे मान्य केले आहे.