esakal | 'मार्च-एप्रिलपर्यंत घरगुती गॅस, पेट्रोल आणि डिझेलचे दर होऊ शकतात कमी'

बोलून बातमी शोधा

dharmendra}

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींनी उच्चांक गाठला आहे.

'मार्च-एप्रिलपर्यंत घरगुती गॅस, पेट्रोल आणि डिझेलचे दर होऊ शकतात कमी'
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

वाराणसी : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींनी उच्चांक गाठला आहे. आजवरच्या इतिहासातील सर्वोच्च पातळीवर या किंमती गेलेल्या आहेत. या इंधन दरवाढीविरोधात विरोधक तर आक्रमक आहेत त्याचबरोबर सामान्य लोकही तक्रार करत आहेत. हे दर केंव्हा कमी होतील, याबाबत सातत्याने सरकारला प्रश्नांच्या घेऱ्यात वेढलं जात आहे. याबाबत आता केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एक वक्तव्य केलं आहे. त्यांनी म्हटलंय की, पेट्रोलियम उत्पादक देशांना तेलाचे उत्पादन वाढवण्यास सांगितलं आहे. जेणेकरुन भारतीय ग्राहकांना वाढत्या किंमतीपासून दिलासा मिळेल. 

हेही वाचा - ब्रेकिंग : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कोरोनाची लस

मागणी वाढल्याने वाढले दर
वाराणसीमध्ये माध्यमांशी बोलताना पेट्रोलियम मंत्र्यांनी म्हटलं की, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये प्रमुख तेल उत्पादक देशांनी उत्पादनामध्ये घट करण्याचा निर्णय घेतला होता कारण कोरोना व्हायरस महासाथीमुळे मागणीमध्ये घट झाली होती. मात्र आतादेखील मागणी वाढूनही उत्पादन कमीच आहे. त्यामुळेच हे पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहेत.

हेही वाचा - 'भारत आणि पाकिस्तान खरे मित्र झालेलं पहायचंय'; नोबेलप्राप्त मलालाने व्यक्त केली इच्छा 

देशात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर कधी कमी होतील या प्रश्नावर त्यांनी म्हटलं की याचा काही अंदाज लावला जाऊ शकत नाही मात्र कुकींग गॅस, डिझेल आणि पेट्रोलचे दर मार्च अथवा एप्रिलपर्यंत कमी होऊ शकतात. गेल्या शुक्रवारी धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं होतं की, थंडीमुळे पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत. थंडी कमी झाल्यानंतर हे भाव कमी होतील, असं अजब विधान त्यांनी केलं होतं.