esakal | 'भारत आणि पाकिस्तान खरे मित्र झालेलं पहायचंय'; नोबेलप्राप्त मलालाने व्यक्त केली इच्छा
sakal

बोलून बातमी शोधा

malala

तिने म्हटलं की, तुम्ही भारतीय आहात आणि मी पाकिस्तानी आहे. आपण चांगले आहोत मात्र तरीही आपल्यात हा द्वेष कुठून तयार झाला?

'भारत आणि पाकिस्तान खरे मित्र झालेलं पहायचंय'; नोबेलप्राप्त मलालाने व्यक्त केली इच्छा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : शांततेचा नोबेल पुरस्कार प्राप्त असणाऱ्या मलाला युसूफजाईने रविवारी म्हटलंय की, मला भारत आणि पाकिस्तान 'चांगले मित्र' बनलेले पहायचे आहे. लोकांना सीमेच्या आत ठेवण्याची नीती आता काम करत नाही. भारत आणि पाकिस्तानचे लोक शांततेने राहू इच्छित आहेत. पुढे त्यांनी हे देखील म्हटलं की, अल्पसंख्यांकांना प्रत्येक देशात सुरक्षिततेची आवश्यकता आहे. मग तो भारत असो किंवा पाकिस्तान असो. हा मुद्दा धर्माशी निगडीत नाहीये तर अधिकारांशी निगडीत आहे आणि या गोष्टीला गांभीर्याने घ्यायला हवे.

हेही वाचा - ब्रेकिंग : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कोरोनाची लस

मुलींच्या शिक्षणासाठी जीवाची बाजी लावून काम करणारी पाकिस्तानची सामाजिक कार्यकर्ती युसूफजाईवर ऑक्टोबर 2012 मध्ये तालिबानच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. मात्र ती त्यातून वाचली होती. पुढे मलालाने म्हटलंय की, इंटरनेट सेवेवर बंदी तसेच भारतात शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अटकेची बातमी चिंताजनक आहे. मात्र, सरकार त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देईल, अशी आशाही तिने व्यक्त केली. 

मलालाने व्यक्ती केली आपली इच्छा
पुढे तिने म्हटलं की, भारत आणि पाकिस्तानला चांगले मित्र बनलेले पाहणे माझं स्वप्न आहे. जेणेकरुन आपण एकमेकांच्या देशात जाऊ शकू. तुम्ही पाकिस्तानी नाटक पाहू शकाल, आम्ही बॉलिवूडचे चित्रपट आणि क्रिकेटचा आनंद घेऊ शकू. ती जयपूर साहित्य महोत्सवमध्ये आपलं पुस्तक 'आय एम मलाला: द स्टोरी ऑफ द गर्ल हू स्टूड अप फॉर एज्यूकेशन एँड शॉट बाय द तालिबान' संदर्भात आपले विचार मांडत होती. डिजीटल पद्धतीने हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. 

हेही वाचा - ‘इस्रो’ची मोहिम यशस्वी;‘ॲमेझोनिया-१’सह १९ उपग्रह अवकाशात

आपल्यामध्ये हा द्वेष कुठून आला?
तिने म्हटलं की, तुम्ही भारतीय आहात आणि मी पाकिस्तानी आहे. आपण चांगले आहोत मात्र तरीही आपल्यात हा द्वेष कुठून तयार झाला? सीमेदरम्यान फूट पाडून राज्य करण्याची जुनी पद्धती आता काम करणार नाही कारण आपण सगळेच शांततेने राहू इच्छितो. भारत आणि पाकिस्तानचे खरे शत्रू हे गरीबी, भेदभाव आणि असमानता आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये एकजूट असायला हवी जेणेकरुन याला दोन हात करता येईल. याशिवाय तिने असंही म्हटलं की, ती त्या दिवसाची वाट पाहत आहे जेंव्हा प्रत्येक मुलगी शाळेला जाऊ शकेल आणि गुणवत्तापूर्ण असे शिक्षण प्राप्त करु शकेल. 

loading image