

Dharmendra Pradhan Resignation Explained
Esakal
नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संतापाचं वातावऱण होतं. या संतापाचा उद्रेक जंतर मंतरवर बघायला मिळाला. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी उपोषण आणि आंदोलनानंतर अखेर सरकारने नमतं घेत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. आंदोलनाच्या सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांकडून याची मागणी केली जात होती. राजीनाम्याच्या मागणीवर आंदोलक ठाम राहिल्यानंतर सरकारला बॅकफूटवर जावं लागलं. दरम्यान, आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या या भूमिकेमागं एक रणनीती आहे. विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष आणि राग याचा वापर देशविघातक शक्ती आणि राजकीय कारणासाठी वापरला जाऊ नये यासाठी राजीनाम्याचं पाऊल उचललं गेलं असं सांगण्यात येतंय. Why Education Minister Dharmendra Pradhan Resigned