धोनीच्या पत्नीचा शस्त्र बाळगण्याच्या परवान्यासाठी अर्ज

वृत्तसंस्था
बुधवार, 20 जून 2018

मी माझ्या घरात जास्तीत जास्त वेळ एकटीच असते. तसेच मी माझ्या वैयक्तिक कामासाठी अनेकदा बाहेर जातही असते. त्यामुळे मला आता एकटे वाटत असून, मला माझ्या संरक्षणासाठी रिव्हॉल्वरची गरज आहे.  

-  साक्षी धोनी, महेंद्रसिंह धोनीची पत्नी

रांची : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षी धोनीने आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत शस्त्र परवाना मिळावा यासाठी अर्ज दाखल केला आहे. यासाठी साक्षीने रांची दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला आहे. मात्र, त्यांच्या अर्जावर अद्याप निर्णय घेण्यात आला नाही.

साक्षीच्या अर्जावर दंडाधिकाऱ्यांनी सकारात्मक निर्णय घेतल्यास साक्षीला स्वसंरक्षणासाठी पिस्तूल किंवा .32 रिव्हॉल्वर मिळण्याची शक्यता आहे. याबाबत साक्षीने सांगितले, की मी माझ्या घरात जास्तीत जास्त वेळ एकटीच असते. तसेच मी माझ्या वैयक्तिक कामासाठी अनेकदा बाहेर जातही असते. त्यामुळे मला आता एकटे वाटत असून, मला माझ्या संरक्षणासाठी रिव्हॉल्वरची गरज आहे.  

दरम्यान, महेंद्रसिंह धोनीला झारखंड सरकारकडून 'वाय' दर्जाची सुरक्षा पुरवली जात आहे. त्यानंतर आता धोनीच्या पत्नीने शस्त्रासाठी अर्ज दाखल केला आहे. 

Web Title: Dhonis Wife Sakshi Applies for Gun Licence