डिझेलवरील अनुदानात 10 रुपयांची वाढ

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जुलै 2018

शेतकऱ्यांना डिझेलसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानात 10 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आज बिहार सरकारने घेतला आहे. यामुळे अनुदानाची एकूण रक्कम आता 50 रुपयांवर गेली असून, राज्यातील दुष्काळसदृश स्थितीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे. 

पाटणा - शेतकऱ्यांना डिझेलसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानात 10 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आज बिहार सरकारने घेतला आहे. यामुळे अनुदानाची एकूण रक्कम आता 50 रुपयांवर गेली असून, राज्यातील दुष्काळसदृश स्थितीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे. 

राज्यात यंदा पर्जन्यमान गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच कमी असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी विविध मंत्री व शासकीय अधिकाऱ्यांची एक उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यात डिझेलवरील अनुदान वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. या अनुदानाचे वाटप उद्यापासून (ता.23) सुरू होईल. या वेळी राज्यातील दुष्काळसदृश स्थितीवर मात करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवरही चर्चा झाली, अशी माहिती मुख्य सचिव दीपक कुमार यांनी दिली. या बैठकीला हवामान विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. त्यांनी पुढील आठवड्यात राज्यात पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री नितीशकुमार 31 जुलै रोजी आढावा बैठक घेणार असून, त्यात राज्यात दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा निर्णय होण्याची शक्‍यता आहे. 

बैठकीतील इतर निर्णय 
- वीजदरात 75 पैशांपर्यंत कपात 
- 48 तासांत ट्रान्सफॉर्मर बदलणार 
- पर्यायी पिकांच्या बियाणांचे 28 जुलैपर्यंत वाटप 
- टॅंकरची संख्या 175 वरून 500 करावी 

 

Web Title: Diesel subsidy increase by 10 rupees in bihar