Bharat Jodo: गेहलोत-सचिन पायलट मतभेदावर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचं विधान; म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ashok gehlot, Rahul Gandhi and sachin pilot

Bharat Jodo: गेहलोत-सचिन पायलट मतभेदावर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचं विधान; म्हणाले...

नवी दिल्ली - पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत प्रचारासाठी गुजरातमध्ये आलेले राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी तेथे एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. तसेच सचिन पायलट यांच्यावर कडाडून टीका करताना त्यांना गद्दार संबोधलं. त्यामुळे गेहलोत आणि पायलट यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचं स्पष्ट झालं. त्यावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी विधान केलं आहे. (differences between ashok gehlot and sachin pilot )

एआयसीसीचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एका निवेदनात म्हटले की, "अशोक गेहलोत हे ज्येष्ठ आणि अनुभवी राजकारणी आहेत. त्यांनी आपले तरुण सहकारी सचिन पायलट यांच्याशी जे मतभेद व्यक्त केले आहेत, ते योग्य पद्धतीने सोडवले जातील, ज्यामुळे काँग्रेस पक्ष आणखी मजबूत होईल,"असंही ते म्हणाले.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

हेही वाचा: Shraddha Murder Case : श्रद्धा केसवर अखेर ओवेसींची प्रतिक्रिया; म्हणाले, लव्ह जिहाद...

रमेश यांनी यावेळी भारत जोडो यात्रेबाबत विधान केलं. ते म्हणाले की, उत्तर भारतातील राज्यांमध्ये भारत जोडो यात्रा अधिक प्रभावी करणे हे प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे.

तत्पूर्वी अशोक गेहलोत म्हणाले होते की,, "गद्दार मुख्यमंत्री बनू शकत नाही... सचिन पायलट यांना हायकमांड मुख्यमंत्री बनवूच शकत नाही... त्यांनी पक्षाशी गद्दारी केली, ते देशद्रोही आहे..."