

गेल्या काही महिन्यांपासून डिजीटल अरेस्टच्या प्रकरणांमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसतेय. वृद्ध, उच्चशिक्षित, इंजिनिअरपासून शिक्षकांपर्यंत अनेक जण या डिजिटल अरेस्टला बळी पडले आहेत. आता मध्य प्रदेशात एका शिक्षिकेनं डिजिटल अरेस्टच्या त्रासामुळे जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. मऊजंग जिल्ह्यातील शिक्षिकेला एक दोन नव्हे तर तब्बल ८ दिवस डिजिटल अरेस्ट करण्यात आलं होतं. पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करत तिच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर शिक्षिकेनं २२ हजार रुपये ऑनलाइन पाठवले. यानंतरही फसवणूक करणाऱ्याने २८ हजार रुपयांसाठी तगादा लावला.