मध्य प्रदेशात राजकीय उलथापालथ; काँग्रेसचे ६ आमदार स्वगृही; तर ५ अजूनही बेपत्ता!

Madhya Pradesh Kamal Nath Digvijay Singh Congress BJP
Madhya Pradesh Kamal Nath Digvijay Singh Congress BJP

भोपाळ : मध्यप्रदेशातील कमलनाथ यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकार पुन्हा अस्थिरतेकडे जात आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण भाजप काँग्रेस आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्वीजय सिंह यांनी केला आहे. तसेच भाजप काँग्रेस आमदारांना 25 ते 35 कोटी रुपयांचे आमिष दाखवत असल्याचा गौप्यस्फोट सिंह यांनी केला आहे. त्यामुळे मध्यप्रदेशातील राजकारण तापल्याचं दिसत आहे.

कमलनाथ सरकारमधील दोन मंत्री जितू पटवारी आणि जयवर्धन सिंह यांना हरियाणातील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच काँग्रेसचे आठ आमदार भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याचं दिग्विजय सिंह यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मध्यप्रदेशात नेमकं काय सुरु आहे याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहे. भाजपने आमीष दाखवलेल्या काँग्रेस आणि मित्रपक्षातील ६ आमदार स्वगृही आले आहेत. तर अजून पाच आमदार बेपत्ता आहेत. 

दरम्यान, माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काँग्रेसने केलेल्या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. तसेच त्यांच्या अंतर्गत वादामध्ये भाजपला ओढलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, काँग्रेस या मुद्यावरुन चांगलीच आक्रमक झाली असून संसदेत यावरुन गदारोळ होण्याची शक्यता आहे. 

पुढील महिन्यात मध्यप्रदेशात राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यसभेत संधी मिळण्यासाठी दिग्वीजय सिंह भाजपवर आरोप करत असल्याची चर्चा आहे. काँग्रेस पक्षावर दबाव आणून राज्यसभेत निवडून जाण्यासाठी सिंह भाजपवर खोटा आरोप करत असल्याचं शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मध्यप्रदेशात विधानसभेच्या एकूण 230 जागा आहेत. मात्र, 2 आमदारांचे निधन झाल्याने सध्या 228 विधानसभेच्या जागा आहेत. काँग्रेसकडे एकूण 114 आमदार असून अपक्ष 4, बसपा 3 आणि सपा 1 असं एकूण 121 आमदारांचं संख्याबळ आहे. तर भाजपकडे एकूण 107 आमदार असून बहुमतासाठी 116 आमदारांची आवश्यकता आहे. त्यामुळे बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आणि टिकवण्यासाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये सतत संघर्ष सुरु असल्याचं दिसून येतंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com