निर्भया खटला : दोषींना फाशीचा मार्ग मोकळा; कायद्यातील पळवाटा संपल्या? 

टीम ई-सकाळ
बुधवार, 4 मार्च 2020

निर्भया प्रकरणातील चारही दोषींना 3 मार्च रोजी सकाळी सहा वाजता फाशी देण्यात येणार होती.

नवी दिल्ली News Delhi Nirbhaya Case : कायद्यातील पळवाटांमुळं सातत्यानं लांबणीवर पडल्यानंतर आता निर्भयाच्या दोषींना फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याप्रकरणातील अक्षय ठाकूर, पवनकुमार गुप्ता, विनय शर्मा आणि मुकेश सिंह यांना न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. पण, सतत्याने दया याचिका दाखल करून हे चौघेही फाशी टाळण्याचा प्रयत्न करत होते. पण, आता त्यांना फाशी देण्याच्या निर्णयातील सर्व अडथळे दूर झाले असून, कायद्यातील पळवाट संपल्या असल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता नव्याने या चौघांना फासावर लटकवण्याचे आदेश दिले जाण्याची शक्यता आहे.

 ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप 

राष्ट्रपतींचा महत्त्वाचा निर्णय 
निर्भया प्रकरणातील चारही दोषींना 3 मार्च रोजी सकाळी सहा वाजता फाशी देण्यात येणार होती. परंतु, आरोपी पवनकुमार गुप्ताने पहिल्यांदा सुप्रीम कोर्टात, क्युरेटिव्ह याचिका दाखल केली. कोर्टाने ती फेटाळल्यानंतर त्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दया याचिका दाखल केली. या याचिकेवरील निर्णय न झाल्यानं पटियाला हाऊस कोर्टाने 2 मार्च रोजी फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली होती. आज, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पवनकुमार गुप्ताच्या याचिकेवर निर्णय दिला. त्यांनी पवनकुमारची दया याचिका फेटाळून लावली. त्यामुळं चारही आरोपींचे कायद्याने फाशी टाळण्याचे मार्ग संपले आहेत. त्यामुळं पुन्हा या चौघांना फासावर लटकवण्यासाठी नव्याने डेथ वॉरंट काढले जाण्याची शक्यता आहे. 

आणखी वाचा - आजीच्या अंगावरून गेली मालगाडी; आजी सुखरूप, पाहा व्हिडिओ 

आणखी वाचा - सुधारणा नाहीच, काळ्यापैशांच्या बाबतीत भारत अजूनही आघाडीवर

तीन वेळा फाशीला स्थगिती
निर्भया प्रकरणातील चारही दोषींना तीन वेळा फाशी देण्याचे आदेश दिले होते. पण, तिन्ही वेळा त्याला स्थगिती देण्यात आली. पहिल्यांदा 7 जानेवारीला फाशीच्या अंमलबजावणीचे आदेश दिले होते. त्यावेळी 22 फेब्रुवारीला फाशी देण्यात येणार होती. त्यावर कारवाईच्या आधीच 17  जानेवारील एक नव्याने फाशीच्या अंमलजावणीचे आदेश देण्यात आले होते. त्यालाही 1 फेब्रुवारीला रोखण्यात आले.  त्यावेळी पवनकुमार आणि अक्षय ठाकूर यांच्याकडे कायदेशीर पर्याय शिल्लक होते. त्यानंतर पुन्हा 17 फेब्रुवारीला एक डेथ वॉरंट जारी करण्यात आले त्याला 2 फेब्रुवारीला स्थगिती देण्यात आली. कारण, पवनकुमारच्या याचिकेवर राष्ट्रपतींनी कोणताही निर्णय दिलेला नव्हता. 

महत्त्वाचा घटनाक्रम 

  • 16 डिसेंबर 2012 रोजी पॅरामेडिकल स्टुडंट असलेल्या तरुणीवर दिल्लीत धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार. तिच्या मित्राला जखमी करून निर्भयासह गाडीतून बाहेर फेकून देण्यात आले होते. 
  • 17 डिसेंबर 2012 देशभरात घटनेचे पडसाद आणि दोषींवर कायदेशीर करा
  • 18 डिसेंबर 20132 मुख्य आरोपी बस ड्रायव्हर राम सिंहसह चारही आरोपींना अटक 
  • 11 मार्च 2013 रोजी मुख्य आरोपी राम सिंहची तिहार कारागृहात आत्महत्या 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news delhi nirbhaya case president rejected mercy petition pawankumar gupta