'दुसऱ्या विवाहानंतर दिग्वियजयसिंहांचे संतुलन बिघडले'

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - भोपाळ मध्यवर्ती तुरुंगातून पळून गेलेल्या आणि नंतर पोलिसांनी ठार केलेल्या आठ दहशवाद्यांच्या घटनेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणारे कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंह यांचे दुसऱ्या विवाहानंतर मानसिक संतुलन बिघडले असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.

वृत्तंसस्थेशी बोलताना स्वामी म्हणाले, "दिग्वियजसिंह यांचे वक्तव्य चुकीचे आणि हास्यास्पद आहे. त्यांनी हेमंत करकरे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हत्या केल्याचे म्हटले होते. दुसरा विवाह झाल्यापासून त्यांचे मानसिक नियंत्रण बिघडले आहे.' तसेच त्यांच्या प्रतिक्रियेवर भाष्य करण्याला काहीही अर्थ नाही' असेही स्वामी पुढे म्हणाले.

भोपाळ मध्यवर्ती तुरुंगात असलेले अमजद, झाकिर हुसेन सादिक, मोहम्मद सालिक, मुजीब शेख, मेहबूब गुड्‌डू, मोहम्मद खालिद अहमद, अकील आणि माजिद हे प्रतिबंधित स्टुडंटस्‌ इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या संघटनेचे दहशतवादी होते. त्यांनी तुरुंगातील सुरक्षारक्षक रामशंकर यांची गळा चिरून हत्या केली आणि पळ काढला. त्यानंतर पोलिसांशी झालेल्या चकमकीत ते आठही जण ठार झाले. या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिग्विजयसिंह यांनी "तुरुंगातून मुस्लिम दहशतवादीच का पळून जातात हिंदू दहशतवादी का नाही?' असे म्हणत प्रश्‍न उपस्थित केला आहे.

Web Title: Digvijaysingh has lost his 'Mental Balance' after second marriage