केंद्रीय मंत्री प्रचारसभेत गरळ ओकतात : डिंपल यादव

वृत्तसंस्था
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

जोनपूर (उत्तर प्रदेश) - उत्तर प्रदेश विधानसभेसाठी निवडणुक प्रचाराचे वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्रीय मंत्री प्रचारसभेत गरळ ओकत असल्याची टीका डिंपल यांनी केली आहे.

येथील प्रचारसभेत बोलताना डिंपल यादव म्हणाल्या, "विरोधकांमधील निराशेची पातळी वाढली आहे. त्यांची भाषा बदलली आहे. केंद्रीय मंत्री सभेला संबोधित करताना गरळ ओकत आहेत. ते धर्म आणि जातीवरून राजकारण करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या तीन वर्षांपासून "मन की बात' करत आहेत. त्यामध्ये जात-धर्म, दिवाळी-रमजान यावरून भेदभाव केल्याचेच दिसून येत आहे.' अखिलेश यादव यांनीही सिद्धार्थनगरमध्ये शनिवारी झालेल्या प्रचारसभेत मोदींवर टीका केली. मोदी यांनी "मन की बात' करण्याऐवजी "काम की बात' करावी, असा सल्ला अखिलेश यांनी यावेळी दिला.

उत्तर प्रदेशमध्ये सोमवारी पाचव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. अकरा जिल्ह्यातील एकूण 51 मतदारसंघांसाठी सोमवारी मतदान होणार आहे. त्यामध्ये बलरामपूर, गोंदा, फैझाबाद, आंबेडकर नगर, बहारिच, श्रावस्ती, सिद्धार्थ नगर, बस्ती, संत कबीर नगर, अमेठी आणि सुलतानपूर या अकरा जिल्ह्यांचा समावेश आहे.

Web Title: Dimple accuses Union Ministers of spitting communal venom during rallies