esakal | प्रेरणादायी! अपंग असूनही 10 वर्षांचा मुलगा खेळतोय फुटबॉल
sakal

बोलून बातमी शोधा

kunal

आयुष्यात असे अनेक प्रसंग येत असतात जेव्हा स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल विचार करण्याची गरज आपल्यावर येते.

प्रेरणादायी! अपंग असूनही 10 वर्षांचा मुलगा खेळतोय फुटबॉल

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

इंफाळ: आयुष्यात असे अनेक प्रसंग येत असतात जेव्हा स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल विचार करण्याची गरज आपल्यावर येते. आपण सध्या काय करतोय किंवा काय करायला हवं याचा विचार करायला बरेच जण सुरुवात करतात. बऱ्याच जणांना आयुष्यात काही गोष्टी सहज मिळतात म्हणून त्यांना त्याचं महत्व राहत नाही. जी गोष्ट आपल्याकडे असते तिचं आपल्याला अप्रुपही नसतं. 

पण इंफाळमधील कुणालची कहानीत खूप प्रेरणादायी आहे. माणसाने जिद्द कधीच हारू नये याचं एक उत्तम उदाहरण कुणालला पाहिल्यावर होतं. कुणाल सध्या चौथीत असून त्याचा जन्म झाला तेव्हांपासून तो अपंग आहे. लहानपणापासूनच त्याला एक पाय नाहीये. तरीही कुणाल एका पायावरच आयुष्य मजेत जगतोय. तरीही तो एका पायाने फुटबॉल खेळतो, सायकल चालवतो. 

Guinness Record: सहा वर्षांचा अरहम ठरला जगातील सर्वात लहान कॉम्प्युटर प्रोग्रॅमर

जिद्द असावी तर अशी-
याबद्दलच कुणालच्या वडिलांनी सांगितले की, 'त्याचा जन्म झाला तेंव्हा त्याला एकच पाय होता. मी त्याला कधीही एकटेपणाची किंवा अंपंगपणाची जाणिव होऊ दिली नाही. त्याचा आत्मविश्वासही कधी कमी होऊ दिला नाही. त्याचाच चांगला परिणाम म्हणजे तो स्वतःहून सायकल शिकला, तो उत्तम फुटबॉलही खेळतोय.' 

नेटकऱ्यांकडून कौतूक-
कुणालचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोकांकडून त्याचं मोठं कौतूकही होत आहे. बऱ्याच नेटकऱ्यांनी कुणालच्या जिद्दीला सलाम केला आहे. त्यामुळे आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी थांबायचं नसतं हे कुणालच्या उदाहरणावरून दिसतं. 

(edited by- pramod sarawale)


 

loading image
go to top