वैज्ञानिक क्षेत्रातही महिलांबाबत भेदभाव

कोलकता - आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवात मनोगत व्यक्त करताना दिव्यांग शास्त्रज्ञ डॉ. कांचन गाबा.
कोलकता - आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवात मनोगत व्यक्त करताना दिव्यांग शास्त्रज्ञ डॉ. कांचन गाबा.

कोलकता - ‘‘समाजातील इतर क्षेत्रांप्रमाणे संशोधन क्षेत्रातही महिलांना प्रोत्साहन मिळत नाही. पदव्युत्तर शिक्षणानंतर पीएच.डी. आणि संशोधन क्षेत्रात येणाऱ्या महिलांची संख्या फारच नगण्य आहे. ही समस्या जगभरात आहे, असा सूर भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवात उमटला. 

महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी गुरुवारी आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्तृत्व गाजविणाऱ्या महिला शास्त्रज्ञांच्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या सत्राला एस. एन. बोस राष्ट्रीय संशोधन केंद्रातील वरिष्ठ प्राध्यापिका डॉ. तनुश्री दासगुप्ता, लष्करी वैद्यकीय सेवेतील मेजर जनरल डॉ. माधुरी कानिटकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ सुदीप्ता सेनगुप्ता, डॉ. कांचन गाबा उपस्थित होत्या. डॉ. दासगुप्ता म्हणाल्या, ‘‘जीवशास्त्र आणि वैद्यकीय क्षेत्रात ज्याप्रमाणे महिलांचे प्रमाण दिसते, त्या प्रमाणात भौतिकशास्त्र, भूगर्भशास्त्र आणि अवकाशविज्ञान अशा क्षेत्रात दिसत नाही. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिलांकडून कुटुंबाची पूर्ण जबाबदारी स्वीकारण्याची अपेक्षा केली जातेे.’’ 

वयाच्या आठव्या वर्षी अंधत्व आलेल्या वकील डॉ. कांचन गाबा यांनी, महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन भेदभावावर मात केली पाहिजे असे प्रतिपादन केले. डॉ. सेनगुप्ता म्हणाल्या, ‘‘लिंग भेदभाव ही नैतिक शिकवण आहे. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही याची जाणीव करून देणे गरजेचे आहे.’’ 

परिषदेच्या दुसऱ्या सत्रात ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन क्षेत्रात महिलांचा दृष्टिकोन’ या परिसंवादाचे आयोजन झाले.

निसर्गाने महिलांना बहुआयामी व्यक्तिमत्त्व दिले आहे. स्वतःचा विकास करण्यासाठी महिलांनी सुरक्षित वातावरणातून बाहेर पडायला हवे. 
- मे. जन. डॉ. माधुरी कानेटकर, माजी विभागप्रमुख, लष्करी वैद्यकीय महाविद्यालय, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com