ModiWithAkshay : माझी आई मला आजही सव्वा रूपया देते : मोदी

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 एप्रिल 2019

'माझी आई कधीच माझ्याकडून पैशाची अपेक्षा ठेवत नाही. पण मी जेव्हा भेटायला जाईन तेव्हा माझ्या हातावर सव्वा रूपया ठेवते,' अशी आईबाबातची आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.

नवी दिल्ली : 'माझी आई कधीच माझ्याकडून पैशाची अपेक्षा ठेवत नाही. पण मी जेव्हा भेटायला जाईन तेव्हा माझ्या हातावर सव्वा रूपया ठेवते,' अशी आईबाबातची आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.

अभिनेता अक्षय कुमार याने मोदींची अराजकीय मुलाखत घेतली, त्यावेळी मोदी बोलत होते. आपण महिन्यातून किती पैसे आईला देते असा प्रश्न अक्षयने केल्यावर 'मी असा मुख्यमंत्री व पंतप्रधान आहे जो आपल्या कुटुंबाचा खर्च सरकारच्या पैशातून करत नाही, उलट माझी आईच मला पैसे देते,' असे सांगितले. तर मी सर्व देशालाच माझे कुटुंब मानतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची अक्षय कुमारने मुलाखत घेतली, ही मुलाखत पूर्णपणे अराजकीय होती. यात मोदींनी बालपणीपासून ते पंतप्रधानपदापर्यंतच्या आठवणींना उजाळा दिला. मोदींनी मतदानाला जाण्यापूर्वीही आईचा आशीर्वाद घेतला होता. 

Web Title: Discussion with Modi about his mother in Akshay Kumar Interview