Disha Patani house firing अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार; ‘या’ गँगस्टरने घेतली हल्ल्याची जबाबदारी!

Bollywood actress Disha Patani’s house attacked : सुदैवाने या गोळीबाराच्या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. तर या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून या घटनेची जबाबदारी घेण्यात आली आहे.
Bollywood actress Disha Patani’s house attacked; gangsters Goldy Brar and Rahul Godara claim responsibility for the firing incident.

Bollywood actress Disha Patani’s house attacked; gangsters Goldy Brar and Rahul Godara claim responsibility for the firing incident.

esakal

Updated on

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या गोळीबाराची जबाबदारी रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार टोळीने घेतल्याचेही सांगितले जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी बरेलीतील सिव्हिल लाईन्स परिसरात अभिनेत्री दिशा पटानीच्या घराबाहेर रात्री उशीरा गोळीबार झाला.

सुदैवाने या गोळीबाराच्या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. तर या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून या घटनेची जबाबदारी घेण्यात आली आहे. ही पोस्ट हिंदीमध्ये करण्यात आली होती, ज्यामध्ये दोन व्यक्तींची नावे घेण्यात आली आहेत आणि चित्रपट उद्योगाला उघड धमकी देखील देण्यात आली आहे. सध्या, पोलिस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत

खरंतर, सोशल मीडियावर एक पोस्ट समोर आली आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, बंधूंनो, आज सिव्हिल लाईन्स, बरेली येथे असलेल्या खुशबू पटानी आणि दिशा पटानी यांच्या घरावर गोळीबार झाला आहे, ती आम्हीच घडवली आहे. एवढंच नाहीतर पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, त्यांनी आमचे पूज्य संत प्रेमानंदजी महाराज आणि अनिरुद्धाचार्यजी महाराज यांचा अपमान केला आहे. मात्र अद्यापर्यंत या पोस्टची पुष्टी झालेली नाही. सद्यस्थितीस बरेली पोलीस या प्रकरणी तपास करत आहे.

Bollywood actress Disha Patani’s house attacked; gangsters Goldy Brar and Rahul Godara claim responsibility for the firing incident.
Shiv Sena UBT Demand : राष्ट्रपती, उपराष्ट्रपती निवडणुकीबाबत उद्धव ठाकरेंच्या पक्षाने केली मोठी मागणी!

त्यांनी आपल्या सनातन धर्माचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या देवी-देवतांचा अपमान सहन केला जाणार नाही. हा फक्त एक ट्रेलर होता. पुढच्या वेळी जर त्यांनी किंवा इतर कोणी आपल्या धर्माचा अनादर केला तर त्याच्या घरात कोणीही टिकणार नाही. हा संदेश केवळ त्यांच्यासाठीच नाही तर चित्रपटसृष्टीतील सर्व कलाकारांसाठी आणि त्यांच्याशी संबंधित लोकांसाठी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com