esakal | 'आदित्यने वडील मुख्यमंत्री झाल्यावर 'छंद' पूर्ण केले नाहीत'; अमृता फडणवीसांना शिवसेनेकडून खणखणीत उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

'आदित्यने वडील मुख्यमंत्री झाल्यावर 'छंद' पूर्ण केले नाहीत'; अमृता फडणवीसांना शिवसेनेकडून खणखणीत उत्तर

'आदित्यने वडील मुख्यमंत्री झाल्यावर 'छंद' पूर्ण केले नाहीत'; अमृता फडणवीसांना शिवसेनेकडून खणखणीत उत्तर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलंच शाब्दिक युद्ध रंगत चाललंय. फडणवीस यांच्या बांगड्यांचा संदर्भ देत करण्यात येणारं विधान, त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी केलेलं ट्विट आणि यावर आलेली अमृता फडणवीस यांची 'रेशीम किडा' ही प्रतिक्रिया. यावर शिवसेनेकडून प्रतिक्रिया येणं अपेक्षित होतं. यावर आता मनीषा कायंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. "उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यावर आदित्य ठाकरेंनी आपले गायनाचे छंद जोपासले नाहीत" असा खोचक टोला शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी लगावलाय. 

VIDEO प्रचंड व्हायरल ! रस्त्यावरून चालणारी ती 'डोकं' नसलेली व्यक्ती कोण...

काही दिवसांपूर्वी भाजपच्या आंदोलनादरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी " 'शिवसेनेनं बांगड्या घातल्या असतील' असा संदर्भ असलेलं विधान केलं होतं. त्यावर प्रत्युत्तर देताना "सर्वाधिक शक्तिशाली असलेल्या महिला बांगड्या घालतात. ते कुठल्याही कमकुवतपणाचं लक्षण नाही. त्यामुळे फडणवीसांनी आपली मानसिकता बदलावी आणि आपल्या विधानाबद्दल माफी मागावी", असं म्हंटलं होतं. मात्र त्यानंतर अमृता फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. 

काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस:
 
"काही रेशमी किडे आयुष्यातील उपहास कधीच समजू शकणार नाहीत, कारण पूर्वजांनी विणलेल्या सुखी रेशमी आयुष्याचा उपभोग घेतच त्यांची भरभराट होते,' असं अमृता फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. मात्र त्यावर आता मनीषा कायंदे यांनी टोला लगावलाय. 

शिवसेनेचं प्रत्युत्तर: 

"प्रबोधनकार ठाकरे, माननिय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वारसा लाभलेले श्री. आदित्य ठाकरे आहेत. त्यांचे वडील मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी आपले गायनाचे छंद जोपासले नाहीत तर त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न सोडवण्याचा छंद जोपासला आहे. " असं शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी म्हंटलंय. 

धक्कादायक! म्हणून त्याने व्हिडिओ कॉल करून दिला तीन तलाक

त्यामुळे आता या टिकेला अमृता फडणवीस यांच्याकडून काही प्रत्युत्तर येणार का हेच बघणं महत्वाचं असणार आहे.  

Shivsena replies to tweet of amruta fadanvis