Nitish Kumar Government : महागठबंधन सरकार बरखास्त करा; उच्च न्यायालयात याचिका दाखल

नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधन सरकार सतत वादात सापडत आहे.
Nitish Kumar-Tejashwi Yadav Government
Nitish Kumar-Tejashwi Yadav Governmentesakal
Summary

नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधन सरकार सतत वादात सापडत आहे.

राष्ट्रीय जनता दलाच्या (RJD) सहकार्यानं स्थापन झालेलं नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधन सरकार सतत वादात सापडत आहे. विरोधी पक्षांच्या राजकीय भाषणबाजीनंतर, हे प्रकरण आता न्यायालयात पोहोचलंय.

सरकार स्थापन होऊन आठवडाही उलटला नाही, तोच सरकार बरखास्त करण्याची मागणी जोर धरू लागलीय. यासाठी पाटणा उच्च न्यायालयात (Patna High Court) याचिका दाखल करण्यात आलीय. असंवैधानिक मार्गानं स्थापन झालेलं हे सरकार बरखास्त करण्यात यावं, अशी मागणी फिर्यादीनं न्यायालयाकडं केलीय.

Nitish Kumar-Tejashwi Yadav Government
किरीट सोमय्यांनी जन्माष्टमीच्या कार्यक्रमात वाजवला ढोल, व्हिडिओ व्हायरल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सामाजिक कार्यकर्त्या धर्मशीला देवी आणि अधिवक्ता वरुण सिन्हा यांच्या वतीनं एक याचिका दाखल करण्यात आलीय. त्याला जनहित याचिका म्हटलंय. याचिकेत म्हटलंय की, 2020 मध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभा निवडणुकीत एनडीएचे नेते म्हणून आपली उपस्थिती दर्शवली आणि त्यांना एनडीएच्या (NDA) नावावर बहुमत मिळालं. आता नितीशकुमार महागठबंधनचा घटक पक्ष बनून मुख्यमंत्री झाले आहेत. हे संसदीय लोकशाही आणि संविधानाच्या मूलभूत रचनेच्या विरोधात आहे.

Nitish Kumar-Tejashwi Yadav Government
दहशतवादी संघटनांना पैसे पुरवणाऱ्या हवाला एजंटला अटक; दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई

याचिकाकर्त्यानं 2017 मध्ये आरजेडी सोडल्यानंतर आणि भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर आरजेडी आणि तेजस्वी यादव सरकारला जनादेश चोरण्यास सांगत होते, याची आठवण करून दिलीय. याच आधारावर नितीशकुमार यांचं सध्याचं सरकार घटनाबाह्य आहे. त्यामुळं कलम १६३ आणि १६४ नुसार राज्यपालांनी नितीश कुमार यांची पुनर्नियुक्ती करू नये. कारण, बहुसंख्य आघाडी सोडून नितीश कुमार यांनी अल्पसंख्याक आघाडीसोबत सरकार स्थापन केलं आणि ते मुख्यमंत्री झाले आहेत, असंही याचिकेत नमूद करण्यात आलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com